Article Marathi Sweet Dishes %e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b3%e0%a5%80 109040100008_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बेसनाची पोळी

चण्याचे पीठ
WD
साहित्य : 1 वाटी चण्याचे पीठ, दीड वाटी दळलेली साखर, 5-6 वेलदोडे, रवा व मैदा प्रत्येकी पाऊण वाटी, पाव वाटी तेल, चवीपुरते मीठ, तांदळाची पिठी, पाव वाटी तूप.

कृती : तुपावर चण्याचे पीठ चांगले तांबूस रंगावर भाजून घ्यावे. नंतर त्यात साखर व वेलदोड्यांची पूड घालून, मळून, गोळा करावा. त्यात जायफळाची पूड करून घालावी. तेल व मीठ घालून रवा व मैदा चांगला घट्ट मिजवावा व नंतर गोळा चांगला कुटून, मऊ करून घ्यावा. पोळीकरिता कणकेच्या दोन गोळ्या कराव्या व त्यांपैकी एका गोळीपेक्षा थोडी मोठी बेसनाची गोळी करावी. कणकेच्या दोन गोळ्यांमध्ये बेसनाची गोळी ठेवून पातळ पोळ्या लाटाव्या व भाजाव्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi