Article Marathi Sweet Dishes %e0%a4%ae%e0%a4%81%e0%a4%97%e0%a5%8b %e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be %e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ab%e0%a5%80 109051300013_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मँगो-व्हेनिला बर्फी

मँगोव्हेनिला पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
साहित्य : 1 लीटर दूध, 150 ग्रॅम साखर, 1 चिमूटभर तुरटी पावडर, 2 वाटी हापूस आंब्याचा गर, 175 ग्रॅम पनीर, 8-10 थेंब व्हेनिला इसेन्स, 1 चमचा पिस्ता काप.

कृती : सर्वप्रथम एक जाड भांड्यात दूध उकळत ठेवावे, दूध उकळत आल्यावर त्यात तुरटीची पूड टाकून हालवावे. जेव्हा दूध खव्या सारखे घट्ट होईल तेव्हा त्यात आंब्याचा गर व अर्धी साखर टाकून हालवावे, घट्ट झाल्यावर एका ताटात थोडं तूप लावून त्यावर हे मिश्रण एक सारखे पसरावे.

दुसऱ्या भांड्यात पनीरचा कीस करून त्यात उरलेली साखर टाकून घट्ट होईपर्यंत शिजवावे. थोडं गार झाल्यावर त्यात व्हेनिला इसेन्स इसेंस टाकून आंब्याच्या मिश्रणावर पसरावे. वरून पिस्त्याचे काप लावून सजवावे. थंड झाल्यावर वड्या पाडाव्यात. मँगो व्हेनिला बर्फी तयार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi