साहित्य : 250 ग्रॅम मैदा, 150 ग्रॅम नारळाचा कीस, 150 पिठी साखर, 150 ग्रॅम लोणी, 5 चमचे दूध, 1 लहान चमचा बेकिंग पावडर.
कृती :लोण्यात साखर घालून चांगले फेटून घ्यावे. मैदा आणि बेकिंग पावडरला चाळून त्यात लोणी व साखरेचे मिश्रण घालावे. नंतर त्यात किसलेले नारळ व दूध टाकून चांगले एकजीव करावे. या मिश्रणाचे दोन भाग करावे. पहिल्या भागाला बिस्किटच्या आकाराचे गोल कापून घ्यावे व दुसऱ्या भागाला त्याच नापाचे चपटे गोल कापावे. ओव्हनमध्ये 375 डिग्री वर सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यावे. थंड झाल्यावर चपट्या गोळ्यांवर पनीर लावून बिस्किटच्या आकाराच्या गोळ्यांवर ठेवून हलक्या हाताने दाबून सर्व्ह करावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा