साहित्य : दोन वाटी बारीक रवा, एक वाटी पिकल्या पपईचा गर, पपई इसेन्स तीन ते चार थेंब, तूप पाव वाटी, काजू-बदामाचे पातळ काप. खोबर्याचा बारीक किस एक वाटी, अर्धा चमचा विलायची पूड, साखर दीड वाटी.
कृती : प्रथम कढईत गरम तुपावर रवा लालसर रंगावर भाजून बाजूला ठेवा. थोड्या तुपावर विलायचीचे पाच-सहा दाणे घालून पपईचा गर परतून घ्या. फोडी विरघळेपर्यंत परता. साखर घाला. दूधमिश्रित दीड वाटी पाणी व साखर घाला. साखर विरघळेपर्यंत ढवळत रहा. चाचणी घट्ट येऊ द्या. नारळाचा किस घाला. अर्धा चमचा विलायची पड घाला, दोनतारी पाक झाल्यावर रव्याचे मिश्रण घाला व परता. हलवत-हलवत मिश्रण थंड होऊ द्या. वरून इसेन्स घालून हलवून घ्या. दोन तासात लाडू वळता येतील.