साहित्य : रसगुल्ले, खवा, पनीर, साखर, इसेन्स, केशर किंवा केशरी रंग.
कृती : रसगुल्ले तयार करून एका थाळीत ठेवावेत. पनीर घेऊन ते कढईत चांगले भाजावे. नंतर साखर (जितके गोड पाहिजे असेल, त्या प्रमाणात), खवा, रोझ, जास्मिन किंवा जे आवडत असेल ते इसेन्स, केशराची पूड हे सर्व जिन्नस चांगले मिसळून घ्यावेत.
नंतर ताटलीत एक एक रसगुल्ला घेऊन त्याला सर्व बाजूंनी वरील तयार केलेले मिश्रण लावावे. नंतर एका ताटात भाजून घेतलेले पनीर घेऊन, त्यात रसगुल्ला घोळून घ्यावा. या प्रमाणे सर्व रसगुल्ले मिश्रण लावून व पनीरमध्ये घोळून घ्यावेत.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा