साहित्य - 1 टिन कन्डेन्स मिल्क, 140 ग्रॅम लोणी, 1 टी. स्पू. व्हॅनिला इसेन्स, 1/4 कप पाणी, 1टी.स्पू. खायचा सोडा, 1 टी.स्पू. बेकिंग पावडर, 140 ग्रॅम ब्राऊन शुगर, 2 टे.स्पू. कोको पावडर, 1/2 टी. स्पू. जायफळ-दालचिनी पावडर, 1 वाटी कापलेले मिक्स ड्रायफ्रूटस्, 225 ग्रॅम मैदा. 2 टे.स्पू. आयसिंग शुगर वरून टाकण्यासाठी.
कृती - लोणी फेटून हलके करा. हलके झाल्यावर त्यात कंडेन्स मिल्क-पाणी-सोडा-इसेन्स-बेकिंग पावडर-कोको पावडर-जायफळ- दालचिनी पूड-ब्राऊन शुगर ड्रायफ्रूट्स हलक्या हाताने मिक्स करून मैदा मिक्स करा. ग्रीझ केलेल्या चौकोनी बेकिंग ट्रेमध्ये मिश्रण पसरवून 180 डिग्रीवर ओव्हनमध्ये 40-45 मिनिटे बेक करा, तयार होऊन गार झाल्यावर त्यावर आयसिंग शुगर पसरवा. चौकोनी आकारात कापून घ्या.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा