साहित्य : एक वाटी मैदा, एक वाटी साखर, अर्धी वाटी लोणी किंवा डालडा, एक अंडा, दोन चमचे बेकिंग पावडर, पाव चमचा मीठ, पाऊण वाटी दूध, एक चमचा व्हॅनिला इसेन्स.कृती : साखर, लोणी किंवा डालडा व मीठ एकत्र करून चांगले फेसावे.
त्यात अंडे फोडून त्याचा बलक घालावा व मिश्रण सारखे करावे. नंतर त्यात मैदा, बैकिंग पावडर, दूध व व्हॅनिला इसेन्स घालून, सर्व जिन्नस मिसळून व मळून गोळा तयार करावा. तो गोळा पोळपाटावर लाटून, पाहिजे त्या आकाराची बिस्किटे पाडावीत व ओव्हनमध्ये भाजावीत.