साहित्य : १ मोठा चमचा ऑरेंज स्क्वॅश, १ चमचा लिंबाचा रस, १ चमचा बारीक चिरलेले निरनिराळे फळ (संत्री, मोसंबी, सफरचंद इत्यादी), २ चमचे ताजी क्रीम किंवा २ चमचे व्हेनिला आइसक्रीम, १ बाटली लेमोनेड.
कृती : लेमोनेडला थंड करावे. फळांना एका लांब ग्लासमध्ये ठेवावे आणि त्यावर ऑरेंज स्क्वॉश टाकावे. लिंबाचा रस आणि आइसक्रीम टाकून थंड लेमोनेडने भरून द्यावे.