साहित्य : 3 कप मँगो पल्प, 4 कप दूध, 3 कप क्रीम, 2 मोठे चमचे कॉर्नफ्लोर, 12 मोठे चमचे साखर, 4 ग्रॅम चायना ग्रास.
कृती : सर्वप्रथम दोन कप दूध उकळावे, उरलेल्या दुधात कॉर्नफ्लोर, साखर घालून उकळत्या दुधात घालावे. घट्ट होईपर्यंत शिजवावे. एक कप पाण्यात चाइना ग्रासला घट्ट होईपर्यंत उकळावे. थंड झाल्यावर त्याला दुधात मिसळावे. त्यात मँगो पल्प टाकून फेटावे आणि फ्रीजमध्ये जमण्यासाठी ठेवावे. जेव्हा हे अर्धवट जमेल तेव्हा त्यात क्रीम घालून परत फेटावे. 3-4 वेळा फेटून झाल्यावर आइसक्रीम जमण्यासाठी ठेवावे.