*गुरूविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरूराया..
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
* शि.. शीलवान, क्ष.. क्षमाशील, क.. कर्तव्यनिष्ठ,
हे गुण विद्यार्थ्यांला देऊ करणारा
दुवा म्हणेज शिक्षक अशा सर्वाना
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
* आई गुरू आहे, बाबाही गुरू आहे.
विद्यालयातील शिक्षक गुरू आहेत.
आयुष्यात ज्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळालं
त्या सर्व व्यक्ती गुरू आहेत.
या शिक्षक दिनाच्या दिवशी
सर्व गुरूजनांना कोटी कोटी प्रणाम.
शिक्षकदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
* अपूर्णाला पूर्ण करणारा,
शब्दांनी ज्ञान वाढविणारा,
जगण्यातून जीवन घडविणारा,
तत्त्वातून मूल्ये फुलविणार्या,
ज्ञानरुपी गुरुंना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
* बोट धरून चालायला शिकवलंत तुम्ही…
पडल्यावर पुन्हा उभं राहायला शिकवलं तुम्ही…
तुमच्यामुळे आज आम्ही आहोत या ठिकाणी…
शिक्षकदिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आहोत ऋणी
* योग्य काय अयोग्य काय हे शिकवता तुम्ही…
खरं काय खोटं काय हे समजवता तुम्ही…
जेव्हा काही कळत नाही तेव्हा योग्य मार्ग दाखवता तुम्ही...
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
* गुरूचं महत्त्व कधी होत नाही कमी…
जरी तुम्ही कितीही मिळवली किर्ती…
तसं तर ज्ञान इंटरनेटवरही मिळतं…
पण योग्य अयोग्याची जाण दिली तुम्ही.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
* आमचं मार्गदर्शक होण्यासाठी…
आम्हाला प्रेरित करण्यासाठी…
आम्हाला आज जे आहोत ते बनवण्यासाठी…
तुमचे खूप खूप धन्यवाद…
शिक्षकदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
* जे आपल्याला एक व्यक्ती म्हणून घडवतात
आणि चांगल्या-वाईटाची ओळख करून देतात,
देशातील या निर्मात्यांना आम्ही करतो शत शत प्रणाम.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश…
* गुरूविना ज्ञान नाही…
गुरूच्या ज्ञानाला अंत नाही…
गुरूने जिथे दिलं ज्ञान तेच खरं तीर्थस्थान…
मनापासून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.
* गुरूने दिला हा ज्ञानरूपी वारसा…
शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
* दिलं आम्हाला ज्ञानाचं भंडार…
केलं आम्हाला भविष्यासाठी तयार…
आम्ही आभारी आहोत त्या गुरूंचे…
ज्यांनी आम्हाला घडवलं आज.
माझ्या जीवनातील
प्रत्येक शिक्षकाला शतशत नमन
शिक्षकदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
* गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः
। गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥
शिक्षकदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
* जे आपल्याला शिकवतात,
आपल्याला समजवतात.
आपल्या मुलांचं भविष्य घडवतात.
माझे मित्र, गुरू आणि प्रकाश बनण्यासाठी धन्यवाद
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
* तुमच्यासारखा शिक्षक मिळणं हे
आशिर्वादापेक्षा कमी नाही.
माझं जग बदलण्यासाठी खूप खूप धन्यवाद
शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
* आम्हाला घडवण्यासाठी जी कठोर मेहनत
आणि प्रयत्न तुम्ही केले त्याबद्दल
आम्ही तुमचे सदैव ऋृणी राहू.
शिक्षकदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
* माझ्या जीवनाची प्रेरणा आहे,
तुम्हीच माझे मार्गदर्शक आहात.
तुम्हीच माझ्या जीवनाचा प्रकाशस्तंभ आहात.
शिक्षकदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
* मी भाग्यशाली आहे की, तुमच्यासारखा गुरू मिळाला.
शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
* आज तुमच्यामुळे माझं भविष्य सोनेरी आहे
मला प्रेरित करण्यासाठी धन्यवाद.
शिक्षकदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
* माझ्या आयुष्यातील प्रेरणा तुम्ही आहात.
तुम्हीच मला सदैव सत्य आणि शिस्तीचा धडा दिला आहे
. तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
* जेव्हा बंद होतात सर्व दरवाजे.
तेव्हा नवा रस्ता दाखवता तुम्ही,
फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर जीवन जगणंही शिकवता तुम्ही.
शिक्षकदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
* योग्य काय अयोग्य काय हे सांगता तुम्ही.
खोटं काय खरं काय हे समजावता तुम्ही.
जेव्हा काहीच कळत नाही तेव्हा मार्ग दाखवता तुम्ही.
आयुष्यातील प्रत्येक अंधारात प्रकाश दाखवता तुम्ही.
शिक्षकदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
* गुरूची उर्जा सूर्यासारखी, विस्तार आकाशासारखा…
गुरूंचं सान्निध्य आहे जगातील सर्वात मोठी भेट…
तेच आहेत जगातील अनेक व्यक्तीमत्त्वांचे शिल्पकार.
शिक्षकदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
* गुरूवर्य तुमच्या उपकारांची कशी करू परतफेड..
लाखो-करोडोंच्या धनापेक्षा माझे गुरू आहेत अनमोल..
काय देऊ गुरूदक्षिणा,
मनातल्या मनात येई विचार..
आयुष्य दिलं तरी फेडता येणार नाही तुमचं ऋण.
शिक्षकदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
* तुमच्या निस्वार्थ प्रेमामुळे आम्ही घडलो.
आम्हाला तुमचा विद्यार्थी केल्याबद्दल
खूप खूप धन्यवाद.
शिक्षकदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
* पुस्तकं, खेळ, गृहपाठ आणि ज्ञान…
आमच्या आयुष्यातील यशाचा स्तंभ
असलेल्या शिक्षकांना
शिक्षकदिनाच्या खूप खूप शुभेच्छा