Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लग्नानंतरचा व्हॅलेंटाईन

लग्नानंतरचा व्हॅलेंटाईन
NDND
'व्हॅलेटाइन डे' हा केवळ प्रियकर आणि प्रेयसी हेच साजरे करू शकतात असे नाही. विवाह बंधनात अडकलेले पती-पत्नीही हा दिवस साजरा करू शकतात. हा दिवस आपल्या आठवणीत रहावा म्हणून विविध रूपात साजरा करू शकतात.

प्रेमाने दिलेली भेटवस्त
webdunia
NDND
एखाद्याने आपल्याला भेटवस्तू दिली तर ती आपल्याला नक्कीच आवडते. आपल्या प्रेमाचे ते एक प्रतीकही असते. म्हणून या व्हॅलेंटाईन डेला आपल्या पत्नीला तिची आवडीची एखादी चांगली भेटवस्तू विकत घ्या. आपल्या पत्नीवर तुमचे 'वजनदार' प्रेम असेल तर एखाद्या सराफी दुकानात जा आणि तिच्यासाठी चांगले दागिने खरेदी करा.

प्रेम व्यक्त करण्‍यासाठी फुलांपेक्षा दुसरा कोणताच उत्तम पर्याय नाही. पण, फुलांचा रंग नारंगी, गुलाबी, लाल असावा कारण हे रंग स्त्री-पुरूषांच्या प्रेम भावनेला व्यक्त करतात. आवड असेल तर आपण आपले घर रंगीबेरंगी फुलांनी सजवून आपल्या जोडीदाराला आनंद‍ी करू शकता. शयनगृहदेखील फुलांनी सजवून पत्नीला एक चांगली भेट द्या.

webdunia
NDND
घरात मेणबत्त्या लावून 'व्हॅलेंटाईन डे' वेगळ्या प्रकारे साजरा करू शकता. मेणबत्त्यांचा मंद प्रकाश आपल्या प्रेमाला दृढ करू शकतो. शक्य असल्यास जेवणाच्या टेबलावरही मेणबत्त्या लावा आणि आपल्या जोडीदाराच्या आवडीचे जेवण त्याला स्वत: च्या हाताने जेवू घाला. मंद प्रकाशात आपण व आपला जोडीदार प्रेमाने जेवण करू शकाल.

महागड्या भेटवस्तू किंवा अलंकार दिल्यामुळेच प्रेम व्यक्त केले जाते असे नाही. आपण एखादी प्रेम कविता किंवा सुंदर पेटिंगही भेटवस्तू म्हणून देऊ शकता. त्यामुळे आपला प्रियकर किंवा प्रेयसी अधिक जवळ येण्यास मदत होते.

डिस्को पार्टी....
व्हॅलेंटाईन डेला छान पार्टी ठेवू शकता. या पार्टीत नृत्य करून आपले मन प्रसन्न होईल व अधिकाधिक वेळ आपल्या जोडीदाराला देता येऊ शकेल.

फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा...

Share this Story:

Follow Webdunia marathi