घर किंवा दुकानाच्या बांधणीच्या वेळेस नकळत काही दोष राहून जातात, तर फारच सोप्या उपायांच्या मदतीने त्यांना दूर करून सुख-शांती मिळवू शकता.
जर दुकानात सारखी चोरी होत असेल किंवा आग लागत असेल तर भौम यंत्राची स्थापना करावी. हा यंत्र पूर्वोत्तर कोण किंवा पूर्व दिशेत, फारशीच्या खाली दोन फूट खोल गड्डा खोदून त्यात स्थापित करावा. जर प्लाट विकत घेऊन बरेच दिवस झाले असतील आणि त्यावर घर बांधण्यास अडचणी येत असतील तर या प्लाटवर डाळिंब (अनार)चा पौधा पुष्य नक्षत्रात लावावा.
घरात नऊ दिवसांपर्यंत अखंड कीर्तन केल्याने वास्तुजनित दोषांचे निवारण होऊन जातात. घरातून निघताना गुळाचे सेवन करून निघावे व थोडेसे पाणी प्यायला पाहिजे, निश्चितच तुमच्या कामात यश मिळेल. घराच्या उंबरठ्यावर काळ्या मिर्यांचे काही दाणे टाकून द्या आणि यावरून पाय देऊन जा. मागे वळून बघायचे नाही. हे उपाय केल्याने तुमचे बिघडलेले काम सुधारतील.
घरात अखंड रूपेण नऊ वेळा श्री रामचरितमानसचा पाठ केल्याने वास्तुदोषाचे निवारण होते. प्रवेश दारावर स्वस्तिकाचे चिन्ह काढावे. जेथेही वास्तू दोष असेल तेथे ह्या चिन्हाला बनवले तर लगेचच घरातील वास्तुदोष दूर होतो.
जर घरात स्वयंपाकघर चुकीच्या दिशेत असेल तर अग्निकोणात एक बल्ब लावून द्या आणि सकाळ संध्याकाळ याला जरूर लावा. दाराचा दोष दूर करण्यासाठी शंख, सीप, कौडी लाल फडक्यात बांधून दारात लटकवून द्या. घरातील सर्व प्रकाराचे वास्तुदोष दूर करण्यासाठी मुख्य दारात एकीकडे केळीचे झाड, दुसरीकडे तुळशीचा पौधा लावायला पाहिजे. दुकानाच्या प्रवेश दाराच्या दोन्ही बाजूने गणपतीची मूर्ती किंवा स्टिकर लावावे.