Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देवघर प्रसन्न ठेवण्यासाठी 5 टिप्स

देवघर प्रसन्न ठेवण्यासाठी 5 टिप्स
प्रत्येक घरामध्ये छोटंसं का होईना देवघर असतंच. घरातील प्रत्येक सदस्य देवाचं दर्शन घेऊनच बाहेत पडत असतो. ही जागा सकारात्मक ऊर्जा उत्पन्न करणारी आहे. म्हणूनच देवघराचं सुशोभिकरण करताना दक्षता बाळगायला हवी. संपूर्ण घराच्या सजावटीबरोबरच देवघराची सजावटही आकर्षक असावी. सध्या वेगवेगळ्या संकल्पनांनुसार देव्हार्‍याची जागा सजवली जाताना दिसते आहे. 
 
घरातील देवघर ही जागा सकारात्मक ऊर्जा उत्पन्न करणारी आहे. म्हणूनच देवघराचं सुशोभिकरण करताना दक्षता बाळगायला हवी. संपूर्ण घराच्या सजावटीबरोबरच देवघराची सजावटही आकर्षक असावी. याकामी उपयुक्त ठरणार्‍या काही टिप्स.... 
 
1.  सध्या घरांचा आकार आक्रसत आहे. अशा वेळी देवघरासाठी बेडरुममध्ये, हॉलमध्ये अथवा स्वयंपाकघरात एखादा कोपरा राखून ठेवला जातो. मात्र या कोपर्‍याचं आकर्षक डिझाईन याला पुजेच्या खोलीचं स्वरूप देऊ जातं. या कोपर्‍याला आकर्षक टाईल्सनं सजवा. टाईल्सला डार्क कलरची वुडन  बॉर्डर लावा. देव्हाराही शिसवी असावा. छताला छोटीशी घंटा टांगावी. हा कंटेम्पररी लूक देवघराला सुशोभित करून जाईल.

2.  कलात्मक दृष्टीनं देवाची खोली सजवायची असेल तर शुभ्र पांढर्‍या अथवा हलक्या पिवळ्या शेडचा वापर करा. या खोलीमध्ये एखादं छानसं पेंटिंग लावा. पेंटिंगमुळे एक प्रकारचा जिवंतपणा अनुभवता येते. जाळीदार पार्टिशन अथवा दरवाच्यामुळे भारतीय वास्तुकलेचा नमुना तुम्ही सादर करू शकता. हे देवघर आगळ्याच रुपात सजेल.  
 
3. शयनगृहामध्ये देवघर करायचं असेल तर छोट्या कॅबिनेटच्या स्वरूपात हा कोपरा सजवावा. ही जागा मोठी भासवण्यासाठी आरश्यांचा सुयोग्य वापर करावा. या ठिकाणी संगमरवरी देव्हारा शोभून दिसेल. देव्हार्‍याच्या कडेनं अथवा खालच्या बाजुनं एलईडी लाईटची माळ फिरवून ही जागा विशेष आकर्षक करता येईल. 

3. देवघराची जागा उठून दिसावी यासाठी टाईल्सबरोबरच वॉल पेपरचाही खुबीन वापर करता येईल. वॉल पेपरमुळे हा भाग उठून दिसेल. 
 
4. देव्हारा ठेवला जाणार आहे त्याजागी लख्ख सूर्यप्रकाश आणि खेळती हवा असायला हवी. यामुळेही उत्तम परिणाम साधला जातो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दैनिक राशीफल (11.09.2016)