Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वास्तू टिप्स: दिवसानुसार खास रंगांचे कपडे परिधान केल्याने भाग्योदय होतो

वास्तू टिप्स: दिवसानुसार खास रंगांचे कपडे परिधान केल्याने भाग्योदय होतो
वास्तुशास्त्रात ज्या प्रकारे दिशांचे महत्त्व आहे त्याप्रकारे रंगांचे देखील आपले महत्त्व आहे. अशात जर त्या दिवशी एखादा खास रंग घालण्यात आला तर भाग्यात सुधारणा निश्चित असते. विशेष दिवसानुसार विशेष रंगांचे कपडे परिधान केल्याने सुख-समृद्धी मिळते आणि प्रत्येक कामात यश मिळत.
 
- सोमवारचा दिवस महादेवाचा असतो म्हणून या दिवशी पांढरे किंवा चांदीच्या रंगाचे कपडे घातल्याने सर्व समस्या दूर होतात.
 
- मंगळवारचा दिवस मारुतीचा असतो. या दिवशी मारुतीला प्रसन्न ठेवण्यासाठी भगवा रंगाचे कपडे धारण केले पाहिजे. या रंगाचे कपडे घातल्याने प्रत्येक क्षेत्रात यश निश्चित मिळेल.
 
- बुधवारचा दिवस गणपतीचा असतो. गणपतीला दूर्वा पसंत आहे. म्हणून बुधवारी हिरव्या रंगाचे कपडे परिधान केले पाहिजे.
 
-गुरुवारचा दिवस विष्णू आणि गुरु देवाचा असतो. बृहस्पती पिवळ्या रंगाचा ग्रह मानला जातो. म्हणून या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले पाहिजे.
 
- शुक्रवारचा दिवस देवीचा असतो. देवीला लाल रंग आवडता असतो म्हणून या दिवशी लाल रंगाचे वस्त्र धारण केले पाहिजे. असे केल्याने सर्व इच्छा पूर्ण होते.
 
- शनिवारचा दिवस शनीचा असतो. या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते. असे केल्याने प्रत्येक क्षेत्रात यश मिळतो.  
 
- रविवारचा दिवस सूर्याचा असतो. या दिवशी सोनेरी किंवा चमकणारे रंग घालायला पाहिजे. याने दिवस चांगला जातो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पत्रिकेत असतात हे 9 प्रकारचे दोष, 1 ही असेल तर मिळतात वाईट परिणाम