सूर्य हे वास्तुशास्त्रावर प्रभावी असतो. म्हणून घराचे बांधकाम करताना हे लक्षात घ्यावं की आपल्याला आपले घर सूर्याच्या दिशेनेच बांधायचे आहे. तसेच आपल्याला आपली दिनचर्या देखील सूर्यावरच ठरवायची आहे.
1 सूर्योदयाच्या पूर्वी रात्री 3 ते सकाळी 6 वाजे पर्यंतची वेळ ब्रह्ममुहूर्ताची असते. या काळात सूर्य घराच्या उत्तर-पूर्व दिशेला असतो. ही वेळ चिंतन ध्यान आणि अभ्यासासाठी चांगली असते.
2 सकाळी 6 ते 9 ची वेळ- या काळात सूर्य घराच्या पूर्व दिशेला असतो. म्हणून घराची बांधणी अशी करावी की सूर्यप्रकाश घरात भरपूर प्रमाणात येईल.
3 सकाळी 9 ते 12 ची वेळ- या काळात सूर्य घराच्या दक्षिण-पूर्व दिशेला असतो. ही वेळ स्वयंपाक करण्यासाठी चांगली आहे. स्वयंपाकघर आणि स्नानगृह ओले असतात. ही जागा अशी असावी की, की इथे सूर्यप्रकाश आल्यावर, ती जागा कोरडी आणि निरोगी राहील.
4 दुपारी 12 ते 3 ची वेळ विश्रांती घेण्याची असते. सूर्य दक्षिण दिशेला असतो, म्हणून शयनकक्ष या दिशेला असावा.
5 दुपारी 3 ते संध्याकाळी 6 ची वेळ- ही वेळ अभ्यास आणि कामासाठीही असते आणि सूर्य दक्षिण-पश्चिम दिशेला असतो म्हणून ही जागा अभ्यासाची खोली किंवा ग्रंथालयासाठी योग्य आहे.
6 संध्याकाळी 6 ते 9 ची वेळ- जेवायला बसणे आणि अभ्यासासाठीची असते म्हणून घराचा पश्चिमी कोपरा जेवायला बसण्यासाठी किंवा बैठकीच्या खोलीसाठी योग्य असतो.
7 रात्री 9 ते मध्यरात्रीची वेळ या काळात सूर्य घराच्या उत्तर-पश्चिम दिशेला असतो. ही जागा शयनकक्षासाठी उपयुक्त असते.
8 मध्यरात्री पासून पहाटे 3 ची वेळ- सूर्य घराच्या उत्तर दिशेला असतो. हा काळ खूप गुपित असतो. ही दिशा आणि वेळ मौल्यवान वस्तू किंवा दागिने ठेवण्यासाठी उत्तम असते.