दिवाळी म्हणजे सर्वांवर लक्ष्मी प्रसन्न व्हावी. घरात भरभराटी यावी हीच प्रार्थना असते. दिवाळीत लक्ष्मीच्या आशीर्वादाने सुख-समृद्धी आणि पैसा टिकून राहावा म्हणून काही वास्तू टिप्स:
* दिवाळीच्या सणात घरात आनंददायी वातावरण ठेवावे. भांडणे, वाद, नकारात्मक बोलणे टाळावे.
* लक्ष्मीचा वरद हस्त कायमस्वरूपी घरावर राहावा म्हणून या अवधीत अशुभ कृत्य व वर्तन टाळावे.
* लक्ष्मी पूजन करताना घरातील दारं- खिडक्या उघडून ठेवाव्या.
* देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दारासमोर रांगोळी काढावी.
* सुख- समृद्धीसाठी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर गजलक्ष्मी उत्तरेला तोंड करून स्थापन करावी.
* लक्ष्मी पूजनासाठी श्री यंत्र, लक्ष्मीचा फोटो, टाक, नाणी, सोने, चांदी, गजलक्ष्मी आणि कुबेर मूर्ती ठेवावी.
* दिवाळीला मनपूर्वक: लक्ष्मी पूजन केल्याने घरामध्ये लक्ष्मीचे आगमन वाढते आणि मिळालेले धन स्थिर राहतं.