केस मोकळे सोडून झोपू नये: रात्री मुलींनी केस मोकळे सोडून झोपू नये. असे मानले आहेत की रात्री केस मोकळे करून झोपल्याने नकारात्मक शक्ती आकर्षित होते. स्त्रियांचं नव्हे तर मोठे केस असलेल्या पुरुषांनादेखील रात्री झोपताना केस बांधून घ्यावे.
चौरस्त्यावर जाऊ नये: रात्री चौरस्त्यावर टोटके आणि तांत्रिक क्रिया केल्या जातात. ज्याला ओलांडल्याने रोग किंवा इतर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. रात्री नकारात्मक शक्तींचा प्रभाव अधिक असतो म्हणून अशा ठिकाणी जाणे टाळावे.
इत्र लावून झोपू नये: शास्त्रांप्रमाणे तेज सुगंध अदभुत शक्तींना आकर्षित करते म्हणून रात्री झोपण्यापूर्वी हात-पाय धुऊन, ईश्वराची आराधना केली पाहिजे. याने रात्री वाईट स्वप्न येत नाही.
परक्या माणसांना भेटू नये: रात्री मुलींनी परक्या माणसांना तर मुलांनी परक्या स्त्रीला एकांतात भेटू नये. वाईट संगत, आणि दारुड्यांपासून दूर राहावे.
मध्यरात्रीनंतर सेक्स करू नये: शास्त्रांप्रमाणे रात्री 12 नंतर दुसरा दिवस लागतो. म्हणून ब्रह्मवेळच्या आधी चुकूनही शारीरिक संबंध बनवू नये. अर्थात ब्रह्मवेळच्या एका प्रहाराआधी किंवा तीन वाजेपूर्वी संबंध बनवणे योग्य आहे त्यानंतर मुळीच नाही.
हे एका प्रकाराचे वास्तू दोष आहे आणि हे काम केल्याने लक्ष्मी रुसून बसते व दुर्भाग्य येतं. म्हणून हे काम करणे टाळावे.