Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वास्तूप्रमाणे स्वयंपाकघर कसे असावे?

वास्तूप्रमाणे स्वयंपाकघर कसे असावे?
, मंगळवार, 28 मे 2019 (09:53 IST)
'स्वयंपाकघर', 'घरामध्ये स्वैपाकघराची आदर्श दिशा म्हणजे आग्नेयकडचा भाग होय.
 
स्वयंपाकघर मध्य उत्तर, मध्य पश्चिम, नैऋत्येकडे, मध्य दक्षिण किंवा घराच्या मधोमध नसावे.
 
स्वयंपाकघर शयन गृहाच्या, पूजेच्या घराच्या किंवा टॉयलेट बाथरूमच्या अगदी थेट खाली किंवा वर नसावे.
 
पीण्याचे पाणी स्वयंपाकघराच्या ईशान्य दिशेच्या कोपर्‍यात ठेवावे. स्वयंपाक  घरात धान्य आणि मिरकूट, हळदी वगैरे मसाले घराच्या नैऋत्य दिशेत साठवून ठेवावे.
 
स्वयंपाक घराचा ओटा पूर्वेकडच्या भिंतीकडे असावा. ज्यायोगे स्वयंपाक  करणार्‍याचे तोंड सहजपणे पूर्व दिशेकडे राहील, तो अत्यंत शुभ संकेत आहे. 
 
स्वयंपाकघराच्या खिडक्या पूर्व-पश्चिम दिशेकडे असाव्या, ज्यायोगे वातावरणाचे विधायक धागे आकर्षित होऊ शकतील. 
webdunia
ओट्यावर कोणते ही कपाट किंवा आलमारी ठेऊ नका, कारण त्यामुळे अकल्पित परिस्थिती उत्पन्न होण्याची भिती निर्माण होऊ शकेल. 
 
स्वयंपाकघरात विरूद्ध दिशेला दोन खिडक्या असाव्यात, ज्यात क्रॉस वेंटीलेशनची सोय असेल. जर स्वैपाकघरात फ्रिज ठेवले असेल तर त्यास वायव्येकडच्या कोपर्‍यात ठेवा. 
 
स्वयंपाकघरात ओटा पूर्व किंवा उत्तरेकडच्या भिंतीला स्पर्श करणारा नसावा परंतु दक्षिण किंवा पश्चिम भिंतीत चिटकलेला असावा. 
 
स्वयंपाकघरात एग्जास्ट फॅन ईशान्येकडील कोपर्‍याच्या दक्षिणेकडे किंवा पूर्वेकडे लावला जाऊ शकतो.
 
पाकघर आणि भोजनगृह एकाच खोलीत असल्यास डायनिंग टेबलाला स्वैपाकघराच्या पश्चिमेकडे ठेवले पाहिजे. कचर्‍याची पेटी किंवा कचरा स्वयंपाकघरात ठेऊ नये, त्यामुळे कुटुंबातील लोकांच्या अरोग्यावर परिणाम होऊ शकतो. 
 
स्वयंपाकघराच्या भिंतीवर पांढरा किंवा निळा रंग असावा. सिंक ओट्याच्या डाव्या बाजूस आणि गॅस (कुकिंग रेंज) ओट्याच्या उजव्या बाजूस असावा. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दूरदर्शी आणि सुहृदयी असणारे मूलांक 1