Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चिचुंदरी घरात फिरत असेल तर...

चिचुंदरी घरात फिरत असेल तर...
, गुरूवार, 2 सप्टेंबर 2021 (10:58 IST)
जगात अनेक गोष्टी आहेत, त्यापैकी काही शुभ मानल्या जातात तर काही अशुभ. अशा स्थितीत उंदरासारख्या आकाराची चिचुंद्री घरात असणे शुभ मानले जाते. आपल्याला माहित असणे आवश्यक आहे की चिचुंद्री तपकिरी, पांढरा, काळा आणि बेज या रंगाची असते. यासह असे मानले जाते की चिचुंद्री एक अतिशय धोकादायक प्राणी आहे आणि ज्यात उंदीर आणि साप खाण्याची क्षमता आहे. होय, घुबड वगळता, कोणीही ते खाण्याची हिम्मत करू शकत नाही, परंतु आज आम्ही तुम्हाला चिचुंदरी घरात असल्याचे फायदे सांगणार आहोत आणि नुकसान देखील.
 
असे म्हटले जाते की जर चिचुंदरी व्यक्तीभोवती फिरल्यास समजून घ्यावं की नजीकच्या भविष्यात त्याला काही मोठा फायदा होणार आहे.
 
त्याचप्रमाणे जर चिचुंदरी घराभोवती फिरत असेल तर त्या घराची आपत्ती टळते.
 
असे मानले जाते की ज्या व्यक्तीला दिवाळीच्या रात्री चिचुंदरी दिसते त्या व्यक्तीचं भाग्य खुलतं. चिचुंदरी बघण्याचा अर्थ असा की आपण खूप भाग्यवान आहात आणि पैशाशी संबंधित आपल्या सर्व समस्या संपणार आहेत.
 
ज्या घरात चिचुंदरी फिरत असेल तर त्या घरात लक्ष्मीचे आगमन होते. मात्र, ज्या घरात स्वच्छता जास्त असते, तिथे चिचुंदरी येण्याची शक्यता कमी असते.
 
जिथे चिचुंदरी आहे तिथे उंदीर, साप, कीटक आणि इतर प्रकारचे प्राणी येण्याची भीती नसते.
 
जिथे चिचुंदरी आहे तिथे बॅ‍क्टिरेया येत नाही कारण कारण हे न दिसणारे बॅक्टेरिया सुद्धा खाते.
 
या झाल्या शास्त्राप्रमाणे ऐकलेल्या गोष्टी परंतु चिचुंदरी घरात असल्याचे नुकसान देखील आहेत.
 
चिचुंद्रीच्या थुंकीत काळ्या सापात असणारे इतके भयंकर विष असतं. असे म्हटले जाते की जर चिचुंद्री आपल्या शरीराच्या कोणत्याही भागावर थुंकली तर तो भाग सुन्न होतो. डोक्याच्या केसांवर थुकंल्यास त्या भागातील केस नेहमीसाठी गळून जातात. 
 
घरात चिचुंद्री असेल तर घरातील अन्नाचे संसर्ग होण्यापासून संरक्षण करावे, कारण चिचुंद्रीचे थुंक विषारी असतं. अन्न संक्रमित झाल्यास आरोग्याला खूप नुकसान होऊ शकतं.
 
चिचुंदरी मुलांना चावल्यास शरीरात विष पसरु शकतं. असे म्हटले जाते की कोणताही प्राणी ज्याला चिचुंदरी चावते किंवा त्याचा शिकार करते, तेव्हा तिचे दात लागल्यावर काही सुचत नाही, मेंदूत धुके पसरतं, श्वास घेण्यास त्रास होतो आणि त्यानंतर तो अर्धांगवायू होतो.
 
रात्री, जर चिचुंदरीने मुलांच्या पायाच्या बोटांना खायला सुरुवात केल्यास माहित सुद्धा पडत नाही. याचे कारण असे आहे की चिचुंदरी चावण्याआधी थुंकीने तो भाग सुन्न करते.
 
चिचुंदरी चावल्यास 'अँटी रेबीज इंजेक्शन' लावलं लागतं. कुत्रे, मांजरी, वटवाघळे, उंदीर, शिंपले, मुंगूस, कोल्हे, वाघ, सिंह आणि इतर सस्तन प्राण्यांच्या चाव्यामुळे रेबीज होण्याचा धोका वाढतो. यामुळे होणाऱ्या आजाराला हायड्रोफोबिया म्हणतात. हायड्रोफोबियामुळे रुग्ण मरू देखील शकतो, म्हणून याला हलक्यात घेऊ नये, चिचुंदरी एक धोकादायक जीव आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

2 सप्टेंबर 2021 आजचं राशिभविष्य : या 3 राशींच्या जातकांना यश मिळण्याची पुरेपुर शक्यता