पूर्व दिशा
जर घराचे मुख्य दार पूर्व दिशेत असेल तर त्याचा रंग नारंगी किंवा सोनेरी असणे चांगले मानले जाते. असे नसल्यास यातून एखाद्या रंगाचा फोटो दारावर लावू शकतात.
दक्षिण दिशा
जर घराचे मेनं गेट दक्षिण दिशेकडे असेल तर त्याचा रंग जांभळा, काळा किंवा डार्क ब्राऊन असायला पाहिजे. असे नसल्यास यातून एखाद्या रंगाचा फोटो दारावर लावू शकता.
उत्तर दिशा
उत्तर दिशेत बनलेल्या मेनं गेटचा रंग हलका निळा असणे सर्वात उत्तम मानले जाते. असे न झाल्याने या रंगाचा फोटो तुम्ही दारावर लावू शकता.
पश्चिम दिशा
पश्चिम दिशेत बनलेल्या मेनं गेटचा रंग पांढरा किंवा हलका पिवळा असायला पाहिजे. असे करणे शक्य नसेल तर या रंगाचा फोटो दारावर लावू शकता.
उत्तर-पूर्व दिशा
उत्तर-पूर्व दिशेचे मेनं गेट पांढर्या किंवा क्रीम रंगाचे असणे शुभ मानले जाते. असे नसेल तर या रंगांपैकी एखाद्या रंगाचे फोटो तुम्ही दारावर लावू शकता.
उत्तर-पश्चिम दिशा
उत्तर-पश्चिम दिशेत बनलेले मेनं गेट हलक्या निळ्या किंवा हलक्या रंगांचे असणे शुभ मानले जाते. असे करणे शक्य नसेल तर यातून एखाद्या रंगांचे फोटो तुम्ही दारावर लावू शकता.
दक्षिण-पूर्व दिशा
जर घराचे मेनं गेट दक्षिण-पूर्व दिशेत असेल तर त्याचे रंग केशरी किंवा पिळवे असणे शुभ असते. असे करणे शक्य नसल्यास यातून एखाद्या रंगाचे फोटो तुम्ही दारावर लावू शकता.
दक्षिण-पश्चिम दिशा
दक्षिण-पश्चिम दिशेत बनलेले मेनं गेट गुलाबी किंवा लाइट ब्राउन रंगाचे असायला पाहिजे. असे नसल्यास यातून एका रंगाचे फोटो तुम्ही दारावर लावू शकता.