Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गणपतीची पूजा केल्याने बरेच वास्तू दोष दूर होतात

गणपतीची पूजा केल्याने बरेच वास्तू दोष दूर होतात
गणपतीचे विविध स्वरूप सर्व दिशांमध्ये आमची रक्षा करतात. वास्तू पुरुषच्या प्रार्थनेवर ब्रह्माने वास्तुशास्त्राच्या नियमांची रचना केली होती. वास्तुदेवाचे समाधान गणपतीच्या आराधने बगैर अकल्पनीय आहे. नेमाने गणपतीची आराधना केल्याने वास्तू दोष उत्पन्न होण्याची शक्यता कमी होते.
 
- जर घराच्या प्रवेश दारावर एकदंताची प्रतिमा किंवा चित्र लावले तर दुसरीकडे त्याच जागेवर दोन्ही गणपतीची पाठ मिळत असेल अशी प्रतिमा किंवा चित्र लावल्याने वास्तू दोष दूर होतो.
 
- भवनाच्या ज्या भागात वास्तू दोष असेल त्या जागेवर तूप आणि सिंदुराद्वारे भिंतीवर स्वस्तिक बनवल्याने वास्तू दोषाचा प्रभाव कमी होण्यास मदत मिळते.
 
- घर किंवा कार्यस्थळाच्या कुठल्याही भागात वक्रतुण्डाची प्रतिमा किंवा चित्र लावू शकता. पण हे लक्षात ठेवण्यासारखे असते की कुठल्याही स्थितीत यांचे तोंड दक्षिण दिशेकडे किंवा नैऋत्य दिशेत नसावे.
 
- घरात बसलेले गणपती किंवा कार्यस्थळावर उभे गणपतीचे चित्र लावायला पाहिजे, पण हे लक्षात ठेवा की गणपतीचे दोन्ही पाय जमिनीला स्पर्श करायला पाहिजे. यामुळे कार्यात स्थिरता येण्याची शक्यता असते.
 
- भवनाचा ब्रह्म स्थान अर्थात केंद्रात, ईशान्य कोपर्‍यात आणि पूर्व दिशेत सुखकर्ताची मूर्ती किंवा चित्र लावणे शुभ असत. पण टॉयलेट किंवा अशा जागेवर गणपतीचे चित्र नाही लावायला पाहिजे जेथे लोक थुंकतात. असे केल्याने गणपतीच्या चित्राचा अपमान होतो.
 
- सुख, शांती, समृद्धीची इच्छा बाळगणार्‍यांनी पांढर्‍या रंगाच्या विनायकाची मूर्ती किंवा चित्र लावायला पाहिजे.
 
- सर्व इच्छांची पूर्ती होण्यासाठी सिंदुरी रंगाच्या गणपतीची आराधना अनुकूल राहते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दैनिक राशीफल 18.09.2018