Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 25 April 2025
webdunia

आपल्या घरात देखील आहे का नकारात्मक ऊर्जा ? तर हे 5 ऊपाय नक्की करून बघा....

negative energy
, शनिवार, 25 जुलै 2020 (19:51 IST)
घरात काहीही न करता अस्वस्थता जाणवते, घरात येतातच मूड बिघडतं, घरातील गोष्टी लवकर खराब होतात. पूजा करण्याची इच्छा होत नाही एकमेकात देखील ताण तणाव राहत असेल तर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे. या नकारात्मक ऊर्जेला दूर करण्यासाठी काही उपाय सांगत आहोत. 
 
1 मतभेदाचे वातावरण :
आपल्या घरात मतभेदाचे वातावरण असल्यास दररोज घरात गुग्गुळ, पिवळ्या मोहऱ्या आणि लोबानधुपाची काडी पेटवा आणि त्याचे धूर संपूर्ण घरात दाखवा, असे केल्याने फायदा तर होणारच तसेच मतभेदाचे वातावरण देखील नाहीसे होतील. 
 
2 घरात असेल नेहमी भीतीचे वातावरण :
नकारात्मक ऊर्जेमुळे भीतीचे वातावरण असते. अश्या परिस्थितीत आपण पाण्यात लवंग आणि गुलाबाच्या पाकळ्या घालून आपल्या कुळदेवांचे स्मरण करून पूर्ण घरात शिंपडावे या मुळे फायदा होणार. 
 
3 घरात वास्तू दोष असल्यास :
मुख्य दारावर हळद आणि शेंदूर गायीच्या तुपात मिसळून 5 वेळा टिळक लावा आणि सकाळी सर्वप्रथम दार उघडल्यावर तांब्याच्या भांड्याने पाणी शिंपडावे, घरात कधीही नकारात्मक शक्ती प्रवेश करणार नाही.
 
4 आर्थिक कमतरतेमुळे घरातील वातावरणात बिघाड :
आर्थिक कमतरते मुळे घरातील वातावरण ताण तणावाचे बनतात. प्रत्येक जण दुखी राहतो. घरात नकारात्मकता पसरते, अश्या परिस्थितीत घरातील वरिष्ठ ती बाई असो किंवा पुरुष असो पिवळे कापडं घालून सकाळी घरातील सर्व सदस्यांकडून तांदूळ घेऊन त्याच बरोबर तूप घेऊन कोणत्याही धार्मिक स्थळावर द्यावे. हे उपाय गुरुवारी करावयाचे आहे, हळू हळू आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ लागेल.
 
5 सर्व काही असून देखील घरात शांतता नाही आपण कोणास शब्द दिले असल्यास आणि ते पूर्ण करत नसल्यास घरात नकारात्मकता येते. कोणाकडून उसनवारी घेतल्यास आणि त्याची परतफेड करण्यात जमत नसल्यास तरीही घरात आनंदी वातावरण राहत नाही. मुलं छळ करतात. अशामुळे आपण त्या व्यक्तीची माफी मागायला हवी ज्याला आपण काही करण्याचे शब्द दिले आहे आणि उधारी उसनवारी थोडं थोडं करून परत फेडा. शनिवारी अपंग आणि गरजूंना अन्न आणि कापड द्या. फायदा होणार.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

साप्ताहिक भविष्यफल 19 ते 25 जुलै 2020