Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Direction for worship वास्तु अनुसार पूजेसाठी योग्य दिशा

puja ghar
, सोमवार, 9 जानेवारी 2023 (11:43 IST)
वास्तुशास्त्रात निर्देशानुसार क्रिया केल्याने नेहमी इच्छित परिणाम मिळतात.  उत्तर आणि पूर्व यांमधील दिशेला वास्तूमध्ये ईशान्य कोन म्हणतात. हे दिशा-क्षेत्र कोणत्याही वास्तूचे सर्वात पवित्र स्थान आहे ज्यामध्ये देवाचा निवास आहे. असे मानले जाते की घराचा ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे जेणेकरून घरात सुख, शांती, आरोग्य आणि लक्ष्मी वास करते. ईशान हे भगवान शिवाचे नाव देखील आहे आणि त्याचे स्थान उत्तर-पूर्व दिशेला आहे. त्यामुळे घरातही ही दिशा केवळ मंदिर किंवा पूजेसाठी वापरली जाते. वास्तूनुसार या स्थानासाठी काही खास गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
 
 घराची ही दिशा सर्वात पवित्र मानली जाते आणि येथे देवाचा वास असल्याचे मानले जाते. त्यामुळे या ठिकाणी कधीही शूज, चप्पल किंवा कचरा गोळा करू नका. असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा संचारते आणि घरात समस्या येऊ लागतात.
 
ईशान्येत काय करावे
घरात समृद्धी हवी असेल तर घराच्या ईशान्य कोपर्‍यात पूजास्थान बनवावे. या ठिकाणी केलेली पूजा नेहमी देवाला मान्य असते आणि यामुळे घरातील सुख-समृद्धीही कायम राहते.घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी या दिशेचा भाग स्वच्छ ठेवावा जेणेकरून घरात नकारात्मक ऊर्जा राहणार नाही.
विहीर, बोअरिंग, मटका किंवा पिण्याचे पाणी यासारख्या कोणत्याही जलस्रोतासाठी हे ठिकाण नेहमीच उत्तम असते. जर तुम्ही नवीन घर बांधत असाल तर घराच्या या कोपऱ्यात बोरिंग लावा किंवा जमिनीखाली पाण्याची टाकी बनवा.
ही दिशा ध्यानाची दिशा मानली जाते त्यामुळे मुलांची वाचन खोली नेहमी ईशान्य दिशेला असावी.
या दिशेने अभ्यास केल्याने लक्ष केंद्रित होण्यास मदत होते.
या दिशेला तुळस आणि केळीचे रोप लावून त्यांची नियमित पूजा केल्याने तुम्हाला आर्थिक लाभही होतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दैनिक राशीफल 09.01.2023