Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सकाळी उठताच या वस्तू पाहणे टाळा, नाहीतर पूर्ण दिवस अशुभ जाईल

best morning routine
सकाळची वेळ ही सर्वात महत्वाची वेळ असते, कारण असे मानले जाते की ज्या पद्धतीने तुमचा दिवस सुरू होतो तसेच तुमचा संपूर्ण दिवस जातो. असेही मानले जाते की सकाळी उठल्यानंतर ज्या गोष्टी तुम्ही पाहतात त्यांचा तुमच्या आयुष्यावरही परिणाम होतो. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीने सकाळी उठल्यानंतर या गोष्टी पाहणे टाळावे.
 
हे पाहणे टाळा- वास्तुशास्त्रात असेही मानले जाते की घरामध्ये थांबलेले किंवा तुटलेले घड्याळ ठेवू नये, कारण यामुळे घरामध्ये नकारात्मकता वाढू शकते. अशात तुम्ही सकाळी उठल्याबरोबर चालत नसलेली घड्याळ पाहू नये, याचा तुमच्या संपूर्ण दिवसावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे घरात खराब घड्याळ न ठेवणेच चांगले.
 
ही सवय सोडा- झोपेतून उठल्याबरोबर आपला चेहरा आरशात पाहण्याची सवय अनेकांना असते. वास्तुशास्त्रात ही सवय अजिबात शुभ मानली जात नाही. याचा तुमच्या संपूर्ण दिवसावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्याऐवजी सकाळी उठल्याबरोबर तुमच्या प्रिय व्यक्तीचे दर्शन घेतले पाहिजे. तर दुसरीकडे वास्तुशास्त्रात सकाळी उठल्यानंतर सावली पाहणे देखील शुभ मानले जात नाही. असे केल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ शकते.
 
हे चित्र पाहू नका- जर एखाद्या व्यक्तीला सकाळी उठल्याबरोबर भक्षक प्राण्यांचे चित्र दिसले तर ते वास्तुशास्त्रानुसार योग्य मानले जात नाही. असे केल्याने व्यक्तीला वादात अडकावे लागू शकते.
 
ही चूक टाळा- हिंदू धर्मात असे मानले जाते की रात्री झोपण्यापूर्वी घाणेरडी भांडी स्वयंपाकघरात सोडल्याने देवी लक्ष्मीचा कोप होतो. याशिवाय सकाळी लवकर घाण भांडी पाहणे देखील शुभ मानले जात नाही. यामुळे दिवसभर माणसाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशात रात्री भांडी स्वच्छ करून झोपा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दैनिक राशीफल 03.02.2024