Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवीन घरात प्रवेश करताना वास्तुशांती कशी व केव्हा करायची?

नवीन घरात प्रवेश करताना वास्तुशांती कशी व केव्हा करायची?
, मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018 (00:19 IST)
नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी वास्तुशांती करणे आवश्यक आहे. घरात होम-हवन, यज्ञ असे धार्मिक कार्य करणे आवश्यक आहे. वास्तुशांती केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. वास्तुशांती केल्यानंतर घराचा शुभ प्रभाव आपल्यावर पडतो. ज्यामुळे आयुष्यात आनंद सुख-समृद्धी प्राप्त होते. वास्तुशास्त्रानुसार शुभ मुहूर्तावर, वाद्याच्या गजरात, कुलदेवतेची पूजा, आलेल्या लोकांचा सन्मान, ब्राह्मणांना प्रसन्न करून घरात प्रवेश करावा. गृह प्रवेश करण्यापूर्वी वास्तुशांती करणे शुभ मानले जाते. वास्तुशांतीसाठी शुभ नक्षत्र आणि मुहूर्त खालील प्रमाणे आहेत... 
 
शुभवार - सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. 
शुभतिथी - शुक्लपक्षातील द्वितीया, तृतीया, पंचमी, सप्तमी, दशमी, एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी. 
शुभनक्षत्र - अश्विनी, पुनर्वसु, पुष्य, हस्त, उत्तराषाढा, उत्तराभाद्रपद, रोहिणी, रेवती, स्वाती, अनुराधा, मगा व घनिष्ठा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दैनिक राशीफल (13.11.2018)