Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वास्तुशास्त्राचे काही खास नियम

वास्तुशास्त्राचे काही खास नियम
, रविवार, 7 एप्रिल 2019 (00:23 IST)
प्राचीन ऋषी-मुनी व शिल्पकार यांनी वास्तुपुरुषाची स्थिती लक्षात ठेवून वास्तु रचना करण्याचे निर्देश दिले आहेत. वास्तू देवतेच्या कोपापासून वाचण्यासाठी आणि जीवनात सुखसमृद्धी आणण्यासाठी या निर्देशांचे पालन केले पाहिजे. या शास्‍त्रांच्या विपरित वास्तु बांधल्यास तीथ रहाणार्‍यांना त्रास होतो. अशावेळी घरात जे वास्तु संमत नाही त्यात बदल करून ती वास्तु रहाण्यास अनुकूल बनवू शकता. त्यासाठी खालील उपाय करा. 
 
घरापुढे, मागे, आजूबाजूला खड्डा असेल तर तो लवकरात लवकर भरा. 
* घरासमोर कचर्‍याचा ढिगारा असेल, न लागणारी सामग्री ठेवली असेल किंवा चिखल व घाण पाणी साठले असेल तर ते 
लगेचच साफ करायला हवे. घरासमोर स्वच्छ जागा असणे चांगले. 
* किचन किंवा डायनिंग रूम घराच्या पश्चिमेकडे नसेल तर आणि ती जागा बदलणे शक्य नसले तर जेवण करताना 
तोंड उत्तर, पूर्व किंवा पश्चिमेकडे असावे. 
* घरातील नैऋत्य कोपरा (दक्षिण-पश्चिम) कधीही रिकामा ठेवू नये. तेथे वजनदार सामान ठेवले पाहिजे.
* घरात पाणी साठवण्याचे स्थान उत्तर, पूर्व किंवा ईशान्य (उत्तर-पूर्व कोपरा) दिशेला असेल तर ईशान्य कोपर्‍यातच जमिनीच्या आत पाण्याची लहानशी टाकी बनवावी आणि पाणी पिताना तोंड पूर्व किंवा पश्चिम दिशेत असायला पाहिजे.
* ईशान्य कोपर्‍यात स्वयंपाकघर, बेडरूम किंवा स्टोअर रूम असेल तर ती जागा तातडीने रिकामी करावी. तिथे देवाचे चित्र लावून पूजाअर्चना करा. 
* स्वयंपाकघर पश्चिम किंवा दक्षिण दिशेला असेल आणि ते बदलणे शक्य नसेल तर आग्नेय कोपर्‍यात (दक्षिण-पूर्व) गॅस ठेवून तेथेच स्वयंपाक बनवला पाहिजे.
* जड वस्तू उदा. धान्याच्या कोठ्या, मोठी भांडी, लोखंडाच्या जाड वस्तू, रिकामे किंवा भरलेले गॅसचे सिलेंडर, कपाटे, इत्यादी 
वस्तू पूर्व, उत्तर, ईशान्य कोपर्‍यात ठेवलेल्या असतील तर त्या उचलून नैऋत्य, दक्षिण किंवा पश्चिम दिशेत ठेवायला पाहिजे. 
* तिजोरी, कपाट किंवा पुस्तकांच्या कपाटाखाली लोखंड किंवा दगडाचे टेकण लावले असेल तर ते काढून लाकडी टेकण 
लावायला हवे.
* तिजोरी नेहमी उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवायला पाहिजे.
* घरात शयनकक्ष वास्तुच्या अनुरूप नसल्यास व त्याला बदलणेही शक्य नसल्यास अविवाहित मुलींनी उत्तर दिशेकडे झोपायला हवे आणि विवाहित जोडप्यांनी पूर्व दिशेच्या शयनकक्षात झोपणे टाळावे.
* ड्रेसिंग रूम नैऋत्य कोपर्‍यात नसेल तर वस्त्र बदलताना नेहमी तोंड उत्तरेकडे असायला हवे.
* घरात आग्नेय, वायव्य, नैऋत्य कोपर्‍यात आणि दक्षिण दिशेला नळ असतील आणि नळाची पाईपलाइनसुद्धा त्याच दिशेत 
असेल तर घराच्या पूर्व-उत्तर किंवा ईशान्य कोपर्‍यात पाण्याची टाकी बनवून घराच्या नळांमध्ये त्या टाकीतून पाण्याचा पुरवठा करावा. 
* स्वयंपाकघर आग्नेय कोपर्‍यात अर्थात दक्षिण-पूर्वच्या कोपर्‍यात नसेल तर दिवसा आणि संध्याकाळी या दिशेला एक दिवा जरूर लावावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

साप्ताहिक राशीफल 7 ते 13 मार्च 2019