बासरी कृष्णाची प्रिय असल्यामुळे फारच पवित्र मानली गेली आहे. पवित्र असून हिचे वास्तूमध्ये खास स्थान आहे. वेग वेगळे रंग आणि प्रकाराची बासरी वेग वेगळे फळ देणारी असते. तुमची मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्या इच्छांनुसार बासरी ठेवायला पाहिजे. तर जाणून घेऊ कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्या रंगाची बासरी ठेवायला पाहिजे. -
बासरीशी निगडित वास्तु टिप्स
1. ज्या लोकांना मनासारखी नोकरी पाहिजे असेल त्यांनी आपल्या खोलीच्या मेन गेटजवळ पिवळी बासरी ठेवायला पाहिजे.
2. व्यापारात वाढ आणि धन लाभ मिळवण्यासाठी दुकानाच्या गल्ल्यात किंवा घराच्या तिजोरीत चांदीची बासरी ठेवणे चांगले मानले जाते.
3. संतानं प्राप्तीची इच्छा ठेवणार्या दांपत्याला आपल्या बेडरूममध्ये हिरवी बासरी ठेवायला पाहिजे. त्याला या प्रमाणे ठेवा की लोकांना नाही दिसायला पाहिजे.
4. आपल्या बिस्तराजवळ किंवा उशीच्या खाली लाल बासरी ठेवल्याने मनासारख्या जोडीदाराशी लग्नाचे योग बनतात.
5. देवघरात मोर पिस लागलेली बासरी ठेवल्याने घर परिवारातील अपुरे काम पूर्ण होण्याची शक्यता असते.
6. नवीन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा ठेवणार्या व्यक्तीला आपल्या कपड्याच्या अल्मारीत लाकडाची बासरी ठेवायला पाहिजे.
7. कठिण आणि मुख्य परीक्षेत यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या खोलीत पांढर्या रंगाची बासरी ठेवणे फारच उत्तम असते.
8. बर्याच वेळेपासून घरात चालत असलेले आजारपणाला दूर करण्यासाठी किंवा आजारापासून दूर राहण्यासाठी स्वयंपाकघरात सोनेरी बासरी ठेवणे उत्तम राहते.
9. घरात चालत असलेले क्लेश किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद दूर करण्यासाठी एकाच रंगाच्या दोन बासरी हॉलमध्ये ठेवणे शुभ मानले गेले आहे.
10. परिवार किंवा व्यवसायाला नकारात्मकतेपासून बचाव करण्यासाठी काळ्या रंगाची सजलेली बासरी घरात किंवा दुकानाच्या छतावर टांगायला पाहिजे.