Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वास्तू टिप्स : आयुष्यात आनंद वाढेल, विश्वास बसत नसेल तर करुन बघा

वास्तू टिप्स : आयुष्यात आनंद वाढेल, विश्वास बसत नसेल तर करुन बघा
, बुधवार, 28 ऑक्टोबर 2020 (15:31 IST)
वास्तू शास्त्र हे खूप प्राचीन शास्त्र आहे. जुनी सभ्यता आणि देऊळ, जुन्या इमारतींमध्ये देखील याचा वापर दिसून येतो. जुन्या काळातील इमारती आणि देऊळात देखील वास्तू कलांचे आश्चर्यकारक नमुने बघायला मिळतात. वास्तुशास्त्रात प्रत्येक दिशानिर्देश आणि बांधकामासाठी काही न काही नियम दिले आहेत. कधी-कधी वास्तुकडे दुर्लक्ष करून आपल्याला बऱ्याच अडचणींना सामोरी जावं लागतं. म्हणून वास्तू लक्षात ठेवून काही करावं. वास्तुमध्ये काही उपाय सांगितले आहेत जे केल्यानं आपण आपल्या आयुष्याला आनंदी करू शकता. चला तर मग जाणून घेऊ या वास्तूचे ते सोपे उपाय.
 
* घरात दररोज देवाची पूजा करून धूप आणि निरांजन ओवाळावी. या मुळे घरातील वातावरण सकारात्मक होतं. पूजा करताना तोंड नेहमीच पूर्वीकडे किंवा उत्तरेकडे असावं. संध्याकाळच्या वेळी घरातील प्रत्येक कोपऱ्यात दिवे लावावे. कारण अंधाऱ्याला वाईट आणि नकारात्मक शक्तींचे घटक मानले जाते.
 
* घरात तुटलेल्या किंवा खराब वस्तू ठेवू नये. खराब आणि बंद पडलेल्या घड्याळीला लगेचच दुरुस्त करवावे किंवा जुनी घड्याळ काढून नवी घड्याळ लावावी. कारण घड्याळ ही काळाची सूचक आहे. म्हणून बंद घड्याळ योग्य मानली जात नाही.
 
* घरात सकारात्मकता आणण्यासाठी मुख्य दारावर दोन्हीकडे स्वस्तिक आणि शुभ-लाभ चे चिन्ह बनवावे. स्वस्तिकचे चिन्ह शुभ मानले आहे. याला मुख्य दारावर बनवल्याने घरात शुभता राहते.
 
* घरात तुळशीचं रोपटं लावावं. तुळस वास्तू दोषाच्या परिणामांपासून संरक्षण करते. दररोज सकाळ, संध्याकाळ तुळशीत पाणी घातल्यानं आणि साजूक तुपाचा दिवा लावल्यानं आई लक्ष्मीची कृपा मिळते.
 
* घरात जेवण बनवताना, प्रथम थोडं अन्न वास्तू देवांसाठी काढून ठेवावं. त्यानंतरच घरातील सदस्यांनी अन्न ग्रहण करावं. वास्तू देवासाठी काढून ठेवलेलं अन्न नंतर गायीला खाऊ घालावं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ज्योतिष संबंधी महत्त्वाच्या 4 गोष्टी