Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घरात नसाव्या या 4 वस्तू, धन अपव्यय आणि सुखात अडथळे येतात

घरात नसाव्या या 4 वस्तू, धन अपव्यय आणि सुखात अडथळे येतात
, मंगळवार, 23 मे 2023 (22:33 IST)
1  वास्तू शास्त्रानुसार, जर आपल्या घरात कोणत्याही पक्षाचे घरटं असल्यास हे अशुभ लक्षण मानले जाते. जर आपल्या घरात देखील असे चिन्ह असल्यास आपल्याला आयुष्यात बऱ्याच प्रकाराचे त्रास सहन करावे लागणार आणि त्याच बरोबर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जेचा संचरण होणार. म्हणून जर का आपल्या घरात अशी स्थिती असल्यास त्याला त्वरित दूर करावं अन्यथा आपणास यांचा दूरगामी परिणामांना सामोरा जावं जावं लागणार. 
 
2 आपल्या घरात मधमाशी किंवा इतर कोणत्याही प्राण्याचे जाळं किंवा घरटं बनू देऊ नका. असे नाही केल्यास आपल्याला आयुष्यात आणि कार्यक्षेत्रात हानी होण्यासारख्या अनेक प्रकारच्या अशुभ गोष्टींना सामोरा जावं लागणार. म्हणूनच आपल्याला घरात अश्या काही गोष्टी आढळल्यास त्याला त्वरित काढून टाका. तरच आपल्याला आपल्या आयुष्यातील होणाऱ्या आर्थिक त्रासापासून आणि समस्ये पासून सुटका मिळू शकेल. 
 
3 आपल्या घरात एखादी तुटलेली वस्तू किंवा भंगलेल्या काच असल्यास त्याला त्वरितच घरातून बाहेर काढून फेकून द्या, अन्यथा आपल्या घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार जास्त होईल आणि आपणांस आयुष्यात अनेक प्रकारांच्या समस्यांना सामोरी जावे लागणार. कारण तुटलेल्या आणि भंगलेल्या वस्तू या अशुभ परिणामाचे संकेत देतात, म्हणून आपण अशी कोणतीही चूक अजिबात करू नका, अन्यथा आपल्याला त्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतील.
 
4 जर आपल्या घरात चुकून वटवाघूळ आलास तर त्यामुळे आपले घराचे वातावरण खराब होईल आणि आपल्याला अनेक प्रकारांचे त्रास आणि आर्थिक समस्येला सामोरी जावे लागणार. कारण वटवाघुळाचे घरात येणं आपल्यातच एक मोठं अशुभ चिन्ह आहे म्हणून जर आपल्या बरोबर अशी कोणतीही घटना घटल्यास आपण त्वरितच घरात गंगाजल म्हणजे गंगेचे पाणी शिंपडावे जेणे करून त्याचा दूषित आणि अशुभ परिणामांपासून स्वतःचे संरक्षण करू शकाल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शनि 140 दिवसांसाठी होत आहे वक्री, त्यामुळे या 5 राशींवर होईल प्रभाव