आपण घरी आल्यावर घाई-घाईने आपले पादत्राणे कुठेही काढून फेकून देत असाल तर सावध होण्याची गरज आहे. कारण जोडे-चपला योग्य दिशेला न ठेवल्यास आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. ज्यामुळे आपली कोणतीही कार्ये पूर्ण होत नाही आणि पैशांचे नुकसान देखील होते. कधीही पादत्राणे पूर्व किंवा उत्तर दिशेला काढू नये.
आपण घरात माती लागलेले पादत्राणे घेऊन आलास की ते उत्तरेकडे काढत असल्यास घरातील सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जेमध्ये बदलते.
हे तर आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे की ज्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते तेथे देवी लक्ष्मी नांदत नसते.
अश्या परिस्थितीमध्ये आपण जेवढे प्रयत्न करता आपल्या हातून पैसे निसटून जातात आणि आपल्याला दुःख आणि त्रास सोसावा लागतो.
म्हणून कधीही आपले घाण असलेले पादत्राणे उत्तरेच्या दिशेने काढू नये, त्यांना दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवावे.