Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वास्तु दोष असल्यामुळे होते चोरी, हे उपाय अमलात आणा आणि भीती पळवा

वास्तु दोष असल्यामुळे होते चोरी, हे उपाय अमलात आणा आणि भीती पळवा
, शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (10:27 IST)
वास्तुशास्त्रानुसार घरात किंवा दुकानात चोरी होण्याचे कारण वास्तुदोष होय. जर आपण वास्तू संबंधित विषयांवर लक्ष दिलं तर चोरी होण्याची शंका कमी होईल. तसं तर या गोष्टीला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही परंतु वास्तूमध्ये या विषयावर काफी महत्त्वाचं सांगितले गेले आहे. घर किंवा दुकानात लहान-सहान चुकांमुळे चोरी होते. आपल्या मेहनतीच्या संपत्तीवर कोणाची नजर पडू नये असं वाटत असेल तर हे टिप्स नक्कीच अमलात आणावे.
 
या दिशेत ठेवू नये आवश्यक वस्तू
वास्तुशास्त्रानुसार घर किंवा दुकानात किमती वस्तू जसे दागिने, महत्त्वाचे कागदपत्रे, पैसे हे वायव्य अर्थात उत्तर-पश्चिम दिशेमध्ये ठेवू नये. या दिशेत ठेवण्याने चोरी होण्याची शंका राहते.
 
या दिशेला फेका दुकानाचा कचरा 
दुकान साफ करताना त्याचा कचरा कधीही रस्त्यावर फेकू नये किंवा दुसऱ्याच्या दुकानासमोर टाकू नये. असे केल्याने प्रगती थांबते. दुकानातील कचरा नेहमी दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवला पाहिजे. या दिशेला कचरापेटी ठेवणे योग्य ठरेल. असे करणे शक्य नसल्यास महापालिकेच्या कचराकुंडीत कचरा टाकून यावा. 
 
घर किंवा दुकानात येथे पैसे ठेवू नये
घर किंवा दुकानात जिथे आपण पैसे ठेवत असाल तिथे पाणी किंवा पाण्याची संबंधित कोणतीही वस्तू ठेवू नये. असे केल्याने पैसा पाण्यासारखा वाहून जातो. त्याला स्थिर ठेवण्यासाठी जवळ कोणती पाण्याची वस्तू नसावी. तसेच घर किंवा दुकानातला मेन गेट इतरांपेक्षा मोठा असला पाहिजे. 
 
आपल्या येथे असे दरवाजे तर नाही 
वास्तुशास्त्रानुसार जर आपल्या घरात किंवा दुकानात एकाच रेषेत तीन दरवाजे असतील तर याने वास्तुदोष निर्माण होतो आणि चोरीची आशंका बनते. आपल्या इथे असे दरवाजे असतील तर त्यावर लाल धाग्यामध्ये बांधलेला क्रिस्टल लटकवावा. याने सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.
 
येथे ठेवा पैसा 
दक्षिण-पश्चिम दिशेला पैसा ठेवण्याने चोरीची भीती कमी होते पण तिजोरीजवळ खिडकी किंवा दार नसावे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाग्योदयासाठी दिशा निर्धारण !