Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुलांना हुशार बनवू इच्छिता, तर अमलात आणा या 14 गोष्टी

मुलांना हुशार बनवू इच्छिता, तर अमलात आणा या 14 गोष्टी
वास्तू शास्त्राप्रमाणे विद्या प्राप्तीचा भरपूर लाभ घेण्यासाठी अध्ययन कक्ष इमारतीच्या पश्चिम-मध्य क्षेत्रात बनवणे अत्यंत फायदेशीर आहे. या दिशेत बुध, गुरु, चंद्र व शुक्र ग्रहांमुळे उत्तम प्रभाव प्राप्त होतं.
 
मानले आहे की या दिशेतील खोलीत अध्ययन करणारे विद्यार्थ्यांना बुध ग्रहामुळे बुद्धी वृद्धी, गुरु ग्रहाने महत्त्वाकांक्षा व जिज्ञासू वृद्धी, चंद्र ग्रहाने नावीन्यपूर्ण कल्पनेचा उदय आणि शुक्र ग्रहाने वक्तृत्व कौशल्य व लेखन कलेत कुशलता व धन वृद्धी होते. 
* अभ्यासाच्या खोलीत आदर्शवादी चित्र, देवी सरस्वती आणि गुरुंची चित्रे लावायला हवी.
* युद्ध, मारामारी, हिंसक पशू-पक्ष्यांचे चित्र व मूर्ती ठेवू नये. 
* अभ्यासाच्या खोलीत पुस्तक ठेवण्याची अलमारी आणि टेबल उत्तर दिशेला भिंतीला लागून ठेवावी.
* स्टडी रूममध्ये पिण्याचे पाणी, मंदिर, घड्याळ उत्तर किंवा पूर्वीकडे ठेवावे.

* स्टडी रूम इतर खोलीपेक्षा खाली किंवा वर नसावी. तळाचे ढाल पूर्व किंवा उत्तरेकडे असावे.
* अभ्यासाच्या खोलीत केवळ ध्यान, अध्यात्म वाचन, चर्चा आणि अभ्यासच करावे. गप्पा, अश्लील काम किंवा असल्या चर्चा करणेही योग्य नाही.
* या खोलीत जोडे-चपला आणि मोजे घालून प्रवेश करू नये.
* विद्यार्थ्याची टेबल पूर्व-उत्तर ईशान किंवा पश्चिम बाजूला असावी. दक्षिण आग्नेय व नैरृत्य किंवा उत्तर-वायव्य मध्ये नसावी.
* या खोलीत खिडकी पूर्व-उत्तर किंवा पश्चिम मध्ये असणे श्रेष्ठ असून दक्षिण मध्ये असणे योग्य नाही.
webdunia
* स्टडी रूममध्ये कधीही शौचालय नसावे.
* या खोलीतील रंगसंगती पांढरी, बदामी, हलका अस्मानी किंवा हलका हलका फिरोजी रंग भीतींवर आणि फर्निचरसाठी श्रेष्ठ आहे. खोलीला काळा, लाल, गडद निळा रंग नसावा.
* स्टडी रूमचा प्रवेश द्वार पूर्व उत्तर-मध्य किंवा पश्चिममध्ये असावा. दक्षिण आग्नेय व नैरृत्य किंवा उत्तर-वायव्य मध्ये असणे योग्य नाही.
* स्टडी रूममध्ये टीव्ही, मॅगझिन, अश्लील साहित्य व सीडी प्लेअर, व्हिडिओ गेम, रद्दी पेपर, अनावश्यक सामान आणि जड वस्तू ठेवू नका.
* स्टडी रूममध्ये झोपू नये.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वास्तुच्या दृष्टिकोनातून दक्षिणायन व उत्तरायण