Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कामात नक्की यश मिळेल केवळ असे करा...

कामात नक्की यश मिळेल केवळ असे करा...
आमच्या जवळपास असणारी ऊर्जा आमच्या कार्यक्षमतेवर सरळ प्रभाव टाकते. जर आपल्या जवळपास सकारात्मक ऊर्जा असेल तर अवघड कामदेखील यशस्वीरीत्या पार पडतं आणि नकारात्मकता जवळपास असल्यास शक्य असेल ते काम देखील अशक्य वाटू लागतं. परिणामस्वरूप निराशा हाती येते.
 
अशात वास्तूमध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहे ज्यांच्या मदतीने जीवनात सकारात्मकता वाढते, कामात मनही लागतं कारण यश मिळणार हे निश्चित असतं.
 
* विद्यार्थ्यांनी कार्यक्षमता वाढवण्यासाठी अध्ययन करताना नेहमी मुख पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावं याची काळजी घ्यावी.
 
* घरात मासोळ्या ठेवणे शुभ मानले गेले आहे. याने वास्तू दोष दूर होतात.
 
* दररोज पक्ष्यांना दाणा-पाणी ठेवल्याने शुभ फल प्राप्त होतात.
 
* घर किंवा प्रतिष्ठानात आपल्या जवळीत वातावरण नेहमी सकारात्मक असावा याची काळजी घ्यावी. नकारात्मक लोकांपासून लांब राहणेच आपल्यासाठी योग्य ठरेल.
 
* घर किंवा प्रतिष्ठान जिथे आपण वावरत असतो ती जागा स्वच्छ ठेवावी.
 
* घराचं मुख्य द्वार स्वच्छ असावं तसेच त्यावर सजावट करायला हरकत नाही.
 
* दररोज घर किंवा प्रतिष्ठानात सुगंधित वातावरण असावं यासाठी धूप, उदबत्ती वापरता येईल.
 
* सकाळीच दिवसभराच्या कामाची योजना आखली पाहिजे.
 
* जेव्हा ही बँकेतून पैसा जमा करायला किंवा काढायला जात असाल तेव्हा देवी लक्ष्मीचे स्मरण करावे.
 
* घर किंवा प्रतिष्ठानात जेथे कुठे पैसे ठेवत असाल ती जागा बीमच्या खाली नसावी.
 
* लॉकरची दिशा उत्तर दिशेत असणे शुभ मानले गेले आहे.
 
* घर किंवा कार्यालयात बंद घड्याळ किंवा खराब मशीन असल्यास लगेच हटवणे योग्य ठरेल.
 
* कधीही हिंसक पशू, उदास पेटिंग्स, सूर्यास्ताची वेळ, बुडत असलेला सूर्य, बुडत असलेलं जहाज, थांबलेलं पाणी असे नकारात्मक चित्र लावू नये.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वास्तुदोषपासून बचाव करण्यासाठी काही सल्ला!