Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Vastu Tips शुक्रवारी मनी प्लांटच्या मुळावर ही छोटीशी गोष्ट बांधा, व्हाल श्रीमंत

Money plant
, शुक्रवार, 1 डिसेंबर 2023 (06:39 IST)
वास्तूनुसार मनी प्लांटला लाल रंगाचा धागा किंवा लाल कपडा बांधणे अत्यंत शुभ मानले जाते. म्हणूनच शुक्रवारी मनी प्लांटच्या मुळाशी लाल रंगाचा कलवा बांधावा. हा धागा किंवा कलवा बांधताना धनाची देवी माँ लक्ष्मीचे स्मरण करून, सुख-समृद्धी, धन-धान्य वाढीसाठी कलवा मुळास बांधावा.
 
नियमितपणे दूध द्या
वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांटला रोज पाणी अर्पण करावे. पाणी देताना त्यात थोडेसे कच्चे दूध मिसळा. असे केल्याने मनी प्लांट वेगाने वाढेल. असे केल्याने व्यक्तीला जलद प्रगती आणि प्रगतीसोबतच धनाचा लाभही होतो.
 
मनी प्लांट घराबाहेर ठेवू नका
तज्ज्ञांच्या मते, वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की अशा ठिकाणी कधीही मनी प्लांट ठेवू नये. बाहेरून येणार्‍या-जाणार्‍यांची नजर मनी प्‍लांटच्या रोपावर पडते. त्यावर कोणाचीही वाईट नजर पडू शकते. म्हणूनच घरामध्ये पैशाच्या आगमनासाठी मनी प्लांट लपवून ठेवणे योग्य आणि चांगले आहे.  
Edited by : Smita Joshi 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दैनिक राशीफल 01.12.2023