पूर्व दिशेने सकारात्मक आणि ऊर्जावान किरण आपल्या घरात प्रवेश करतात. वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा पूर्व दिशेला असेल तर ते खूप चांगले असते.
घराची खिडकी देखील पूर्व दिशेला आपण लावू शकतो.
दिशेच्या एका बाजूला म्हणजे आग्नेय बाजूला आपण किचन ठेवत असतो, आणि सकाळचा सूर्यप्रकाश किचन वर येणे अतिशय चांगले मानले जाते, कारण त्यामुळे किचन वर असलेले जीव जंतू नाश पावतात आणि घर निरोगी राहते.
वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशेचे महत्व आणि टिप्स-
* शनि भगवान हे पश्चिम दिशेचे स्वामी आणि वरुण ही या दिशेची देवता आहे.
* पश्चिम दिशा भाग्य, पुरुषत्व, कर्म आणि यशाची सूचक आहे.
* पश्चिम दिशेला लेडीज स्पेशल दिशा म्हटले जाते, कारण इथे महिलांनी किंवा त्यांच्या नावाने झालेल्या गोष्टी सहज यशस्वी होतात.
* या वास्तूमध्ये शनीचा प्रभाव शुभ नसेल तर वास्तू दोष निर्माण होऊ शकतात.
* वारंवार अपयश, घरातील अशांतता इत्यादी समस्या निर्माण करू शकतात. या संरचनात्मक दोष दूर करण्यासाठी * घरी नियमितपणे धार्मिक ग्रंथांचे पठण करावे.
* पश्चिम दिशा काम करण्यासाठी आहे, पश्चिम दिशा माणसाला अधिक कष्ट करण्यास प्रवृत्त करते. ज्या मुलांची खोली पश्चिमेकडे आहे (5वी पासून पुढे), त्यांचा शैक्षणिक आलेख आणि प्रतिभा त्यांना भारताबाहेर घेऊन जाऊ शकते. भारतात राहिल्यास वर्षाला 24 ते 25 लाखांचे पॅकेज मिळण्याइतपत प्रगती करेल.