Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वास्तुच्या दृष्टिकोनातून दक्षिणायन व उत्तरायण

वास्तुच्या दृष्टिकोनातून दक्षिणायन व उत्तरायण

वेबदुनिया

पृथ्वी सूर्याभोवती एकसमान गतीत परिभ्रमण करत असते. परंतु, तिचा अक्ष सूर्याशी काटकोनात नसून 66.5 डिग्री अंशात कललेला आहे. त्यामुळे परिभ्रमणात पृथ्वी सतत एका बाजूला झुकलेली आढळते, त्यामुळे तिच्यापर्यंत पोहोचणार्या सूर्यकिरणांच्या अंतरामध्ये बदल होतो.

सूर्याची किरणे कधी मकरवृत्तावर (23.5 साडेतेवीस अंश अक्षवृत्त) (0 डिग्री अंश अक्षवृत्त) काटकोनात पडतात तरी कधी विषुववृत्तावर तर कधी कर्कवृत्तावर (साडे-तेवीस अंश उत्तर अक्षवृत्त) सूर्याची किरणे लंबरूप पडतात. सूर्याची किरणे 22 डिसेंबरला मकरवृत्तावर लंबरूप पडतात. 22 डिसेंबरनंतर ही किरणे मकरवृत्ताच्या उत्तरेला अजून लंबरूप होत जातात. ही सूर्याची उत्तरायणाची स्थिती आहे. (यालाच पृथ्वीचे उत्तरायण असे म्हणतात.) हीच स्थिती 21 जूनपर्यंत राहते. तसेच त्यानंतर (22 जूनपासून) सूर्याची किरणे परत दक्षिणेला लंबरूप पडायला सुरवात होते. ज्याला पृथ्वीचे दक्षिणायन म्हणतात. ही स्थिती 21 डिसेंबरपर्यंत कायम राहते. जेव्हा सूर्य उत्तरायणात असतो (21 मार्च) तेव्हा त्याची किरणे भूमध्येरेषेशी (0 डिग्री अक्षवृत्त विषुववृत्तावर) लंबरूप पडतात. त्या दिवशी पृथ्वीवर दिवस व रात्र सारखीच म्हणजेत 12-12 तासांची असते.

webdunia
PR Ruturaj  
पृथ्वीचे उत्तरायण पूर्ण होण्यास 187 दिवस लागतात (21 मार्च ते 23 सप्टेंबर) पण दक्षिणायनात पृथ्वीची गती 23 सप्टेंबर ते 21 मार्चपर्यंत इतकी वाढते की ती दक्षिणायन 178 दिवसात पूर्ण करते. याचे कारण पृथ्वीची भ्रमणकक्षा वर्तुळाकार नसून ती लंब वर्तुळाकार (अंडाकृती) आहे. यामुळेच पृथ्वी कधी सूर्याच्या जवळ जाते तर कधी सूर्यापासून दूर. पृथ्वी 3 जानेवारीला सूर्याच्या सर्वांत जवळ असते. त्यावेळी तिचे सूर्यापासूनचे अंतर 14 कोटी 75 लाख किलोमीटर असते. तसेच 4 जुलैला तिचे सूर्यापासूनचे अंतर सर्वांत जास्त म्हणजे 15 कोटी 25 लाख किलोमीटर असते.

पृथ्वीच्या या कललेल्या आसामुळे नॉर्वेच्या उत्तरभागात अर्ध्या रात्रीपण सूर्य दिसतो. त्यालाच मध्यरात्रीचा सूर्य म्हणतात. दोन्ही ध्रुवावर तर सहा महिन्याचा दिवस व सहा महिन्याची रात्र असते. वास्तुशास्त्रात सुर्याच्या या उत्तरायणाचे तसेच दक्षिणायनाचे फार महत्त्व आहे.

webdunia
PR Ruturaj  
पूर्वीच्या काळी तर असे मानले जात असे की मनुष्याच्या मृत्युनंतर त्याला उत्तरायणातच मोक्ष मिळतो. महाभारताच्या काळात इच्छामरणी पितामह भीष्मांनशरीराचा त्याग करण्यासाठी शरपंजरी राहूनही सूर्याचे उत्तरायण सुरू होण्याची वाट पाहिली.

इतर शुभ कार्यांसाठी म्हणजे गृह-प्रवेश, घरभरणी या सारखी कामे उत्तरायणात करणे शुभ मानले जाते. म्हणूनच वास्तुशास्त्रात, घरबांधणी करताना पूर्व व उत्तर दिशेला जास्तीत जास्त जागा मोकळी सोडावी, जास्तीत जास्त खिडक्या दरवाजे व मोठे व ऐसपैसे व्हरांडे ठेवावेत असे सांगितले आहे. त्याबरोबरच पूर्वेला तसेच उत्तरेला मोठी झाडे, उंच इमारती, उंच भिंती बांधू नयेत असेही सांगितले आहे. कारण त्यामुळे सूर्यकिरणे आपल्या घरात पोहोचू शकत नाहीत. त्यांच्या मार्गात या उंच गोष्टींचा अडथळा येतो
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आज तुमचा वाढदिवस आहे (25.11.2016)