Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मूक मासोळ्याचे बोलते एक्वेरियम

मूक मासोळ्याचे बोलते एक्वेरियम
घरातच जर समुद्राचा आनंद घ्यायचा असेल तर त्यासाठी एक्वेरियम सारखे दुसरे ऑप्शन नाही. प्रकृती प्रेमी या रंग बेरंगी मासोळ्यांद्वारे घराच्या सजावटीत वाढ करू शकता. हेच नव्हे तर वास्तुनुसार पण हे उद्योग धंधा आणि घरासाठी शुभ मानण्यात आले आहे. आजकाल बाजारात निर निराळ्या मासोळ्या उपलब्ध आहेत. एक्वेरियमच्या किमती देखील हजारांमध्ये झालेल्या आहे. 
 
पावसाळ्यात ह्या लहान लहान मासोळ्यांची विशेष देखरेख केली पाहिजे. या दिवसांत त्यांना फंगल इनफेक्शन, व्हाइट स्पॉट होतात, ज्याने त्यांचा जीवसुद्धा जातो. फंगल इन्फेक्शन झाल्यास मीठाचे खडे आणि फंगलचे औषध पाण्यात घालून फिश पॉटमध्ये टाकावे. ज्याने 2-3 दिवसांत त्यांचे इनफेक्शन बरे होते. 
 
घरात वास्तूसाठी म्हणून लोकं गोल्ड फिशची मागणी सर्वात जास्त करतात. साइजप्रमाणे यांची किंमत ठरवण्यात येते. यांच्या बर्‍याच व्हॅरायटी बाजारात सापडतात जसे रेड कॅप, कॅलिको गोल्ड, लीची गोल्ड, शुभांगिन असे आहे. त्या व्यतिरीकत सिल्वर शार्क, एंजल, सिल्वर डॉलर, ब्लॅक मॉली, ग्लास फिश, ब्लू ग्रॅमी, लीव फिशची सुद्धा बाजारात डिमांड आहे. 
 
ऑफिसमध्ये रिसेप्शनच्या जागेवर एक्वेरियम ठेवणे शुभ असते. एक्वेरियममध्ये 8 गोल्ड फिश आणि एक ब्लॅक फिश ठवणे उत्तम. एक्वेरियम किंवा फिश बाऊलला नेहमी नार्थ ईस्ट किंवा नार्थ वेस्ट कार्नरमध्ये ठेवायला पाहिजे. 
 
एक्वेरियममध्ये पोस्टर लावून त्याला अजून आकर्षक बनवू शकता. घर आणि ऑफिसमध्ये एक्वेरियम ठेवणे संभव नसल्यास तुम्ही मासोळ्यांचे पोस्टर लावून आपल्या वास्तुला शुभ करू शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गणेश उपासनेमुळे लग्न लवकर जुळतं