Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राशींचा प्रभाव आणि व्यक्तीचा स्वभाव

राशींचा प्रभाव आणि व्यक्तीचा स्वभाव
webdunia
WD
मेष : याचा राशी स्वामी मंगळ आहे. तसेच ही राशी पूर्वेची स्वामिनी आहे ही राशी पुरूष जातीची असून लाल, पिवळ्या रंगाची, कांतीहीन, क्षत्रिय वर्ण, अग्नी तत्त्वाची, संज्ञा-चर, समान अंगांची, कमी मुले असणारी, पित्त प्रकृतीची आहे. स्वभाव अहंकारी, साहसी तसेच मित्र-मैत्रीणींविषयी विशेष प्रेमळ आहे. हिच्याकडून डोक्याचा विचार केला जातो.

webdunia
  WD
वृषभ : हिचा राशी स्वामी शुक्र आहे व ही दक्षिणेची स्वामिनी आहे. ही राशी स्त्री जातीची, श्वेत वर्णी, कांतीहीन, वैश्यवर्ण, भूमितत्वाची, स्थिर संज्ञेची, शिथिल शरीराची शुभकारक तसेच बडबडी आहे. हिचा स्वभाव स्वार्थी, सांसारीक गोष्टीत दक्षता तसेच डोक्याने काम करणारी. हिला उर्ध्वजलराशी सुद्धा म्हणतात. हिच्याकडून तोंड व कपाळाचा विचार होतो.

webdunia
  WD
मिथून : हिचा राशीस्वामी बुध असून ही पश्चिमेची स्वामिनी आहे. ही राशी पुरूष जातीची, हिरव्या रंगाची, मूलतुकीत, शुद्र वर्णाची, पश्चिम वायु तत्वाची, उष्ण, बडबडी, मध्यम संतती असणारी, शिथिल शरीराची तसेच विषयासक्त आहे. हिचा स्वभाव कलात्मक व अभ्यासक आहे. हिच्याद्वारे शरीराचे खांदे व बाजूंचा विचार होतो.

webdunia
  WD
कर्क : हिचा राशी स्वामी चंद्र, ही उत्तरेची स्वामिनी आहे. ही राशी स्त्री जातीची असून लाल आणि पांढरा रंग एकत्रित अशा वर्णाची आहे. संज्ञा जलचर असून सौम्य व कफ प्रवृत्तीची राशी आहे. भरपूर संतान, रात्रीबळी चरणाची समोदयी आहे. स्वभाव लाजाळू, संसाराच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील राहणारा तसेच वक्तशीर आहे. हिच्याकडून वक्षस्थल व गुडघ्यांचा विचार केला जातो.

webdunia
  WD
सिंह : सिंहेचा राशी स्वामी सूर्य असून ही पूर्वेची स्वामिनी आहे. ही पुरूष प्रकृतीची, पिवळ्या रंगाची, क्षत्रीय वर्णाची, पित्त प्रकृतीची, अग्नी तत्त्वाची, तापट स्वभावाची, शरीराने जाड, प्रवास आवडणारी, कमी संतानप्राप्ती असणारी निर्जल रास आहे. हिचा स्वभाव मेष राशी सारखा आहे पण हिच्यात उदारता आणि स्वातंत्र्यप्रियता जास्त आढळते. हिच्याद्वारे हृदयाचा विचार केला जातो.

webdunia
  WD
कन्या : राशीस्वामी बुध असून दक्षिणेची स्वामिनी आहे. ही राशी स्त्री जातीची, पिंगट रंगाची, वायू तसेच शीत प्रकृतीची, पृथ्वी तत्त्वाची, रात्रबली तसेच कमी संतती असणारी आहे. हिचा स्वभाव मिथून राशीसारखा आहे. पण ही राशी स्वत:ची प्रगती तसेच सन्मानाकडे जास्त लक्ष देते. हिच्याकडून पोटाचा विचार केला जातो.

webdunia
  WD
तूळ : राशीस्वामी शुक्र असून ही पश्चिमेची स्वामिनी आहे. ही पुरूष जातीची, सावळ्या वर्णाची, चर संज्ञेची शुद्र वर्णाची वायू तत्वाची, दिवसा प्रभावी, क्रूर स्वभावाची, शिर्षोदयी, कम‍ी संतती असणारी, पायदळ राशी आहे. हिचा स्वभाव ज्ञानप्रिय, राजनितीतज्ञ, विचारशील तसेच कार्यसंपादक आहे. हिच्याद्वारे बेंबीच्या खालच्या अंगाचा विचार केला जातो.

webdunia
  WD
वृश्चिक: राशीस्वामी मंगळ आहे. ही उत्तरेची स्वामी असून स्त्री जातीची, शुभ वर्णाची, कफ प्रकृत्त‍ीची, ब्राह्मण वर्णीय, रात्री प्रभावी, पुष्कळ मुलेबाळे असणारी, उर्ध्वजल राशी आहे. हीचा स्वभाव स्पष्टवक्ता, निर्मळ, निश्चयी, ठाम व हट्ट‍ी आहे. हिच्याद्वारे जनन इंद्रीयाचा विचार केला जातो.

webdunia
  WD
धनू: हिचा राशीस्वामी गुरू असून ही पूर्वेची स्वामिनी आहे. ही राशी पुरूष जातीची, सोन्याच्या रंगाची, द्वीस्वभावी, क्षत्रिय वर्णाची, दिवसा प्रभावित, पित्त पकृतीची, अग्नी तत्वाची, कमी मुलेबाळे असणारी, सदृढ शरीराची‍, उर्ध्वजल तत्व राशीची आहे. हिचा स्वभाव मायाळू, मर्यादाशील तसेच हुकूमत गाजवणारा आहे. ही राशी पाय, सांधे तसेच जांघेचा विचार करते.

webdunia
  WD
मकर: हिचा राशीस्वामी शनी असून ही दक्षिणेची स्वामिनी आहे. ही स्त्री जातीची, पिंगट वर्णाची, रात्री प्रभावी, वैश्य वर्णीय, पृथ्वी तत्त्वाची, शिथिल शरीराची व वात प्रकृतीची आहे. हीचा स्वभाव चांगल्या स्थितीची कायम अपेक्षा ठेवतो. हिच्याद्वारे पाय तसेच घोट्यांचा विचार केला जातो.

webdunia
  WD
कुंभ: कुंभेचा राशीस्वामी गुरू असून ती पश्चिमेची स्वामिनी आहे. ही पुरूष जातीची विचित्र रंगाची, वायु तत्वाची, शुद्ध वर्णाची, त्रिदोष पकृतीची, उग्र स्वभावाची, उर्ध्वजल, मध्यम संतान असणारी, शिर्षोदयी, क्रूर तसेच दिवसा प्रभावी असणारी राशी आहे. हिचा स्वभाव शांत, विचारशील, धार्मिक तसेच नवीन वस्तूंच्या निर्मितीचा आहे. हिच्याकडून पोटाच्या आतल्या बाजूचा विचार केला जातो.

(अनुवाद- सौ. भाग्यश्री कुलकर्णी)

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आज तुमचा वाढदिवस आहे (22.11.2016)