rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वास्तुप्रमाणे भूमि परिक्षण कसे करावे!

vastu article in marathi
वास्तु निर्मिती करण्यासाठी योग्य जागा निवडण्यासाठी काही भूमि परिक्षण करण्याच्य सोप्या पद्धती.
 
पद्धत क्र. १- एक फूट रुंदी व एक फूट लांबी व एक फूट खोली असलेला खड्डा प्लॉटमध्ये खोदावा. त्या नंतर खोदून काढलेली माती पुन्हा त्या खड्ड्यात 
भरावी खड्डा भरून माती उरल्यास ती भूमी चांगली जाणावी.
 
पद्धत क्र. २- वरील प्रमाणे खड्डा करून त्यात पूर्ण पाणी भरणे व खड्ड्यापासून १०० पाऊले चालत जाऊन परत येणे. या वेळात शिल्लक पाणी ३/४ कमी 
झाल्यास ती भूमी अयोग्य जाणावी. पाणी निम्म्यापेक्षा जास्त राहिल्यास उत्तम भूमी जाणावी.
 
पद्धत क्र. ३- वरील प्रमाणे सूर्यास्तास खड्डा पाण्याने पूर्ण भरणे आणि सूर्यादयाला परिक्षण करणे. जर पणी निम्म्यापेक्ष जास्त शिल्लक असेल तर जमिन उत्तम. जर पाणी आटून पूर्ण तळाला भेगा पडाल्या असतील, तर ती भूमी अत्यंत वाईट जाणावी.
 
पद्धत क्र. ४- वरील प्रमाणे खड्ड्यात पाणी भरणे जर पाणी प्रदक्षिणा मार्गाने फिरत असेल तर चांगले, उलट फिरत असल्यास अशुभ परिणाम जाणावेत.
 
पद्धत क्र. ५- प्लॉटच्या काही भागात ची पेरून त्याचे अपेक्षित कालात मोड आल्यास उत्तम न आल्यास अशुभ

प्लॉटची जमीन : ज्या जमिनीवर वनस्पती झाडे उगवतात. ती जमिन सजीव भूमी समजली जाते. अशी जमिन वास्तुसाठी शुभ असते. ज्या जमिनीत वनस्पती, हिरवे गवत उगवत नाही, जिथे किंचीत ओलावा नाही, जी जमिन खारी आहे, ज्या जमिनीत काटेरी वनस्पती उगवतात किंवा जी जमिन खडताळ, रेताड असेल अशा भूमिला मृत भूमी समजतात. अशी भूमी वास्तू निवासासाठी अयोग्य असते. या जागेत रहिवाश्याची प्रगती होणे अशक्य असते. त्याचप्रमाणे मन स्वास्थ्य लाभत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दैनिक राशीफल 16.07.2018