तुमच्या ऑफिसची रचना वास्तुशास्त्रानुसार केल्यास व्यवसायास त्याचा नक्की फायदा येतो. सुरवातीला ऑफिसच्या प्रवेशाच्या खोलीकडे म्हणजे बाह्यरचनेकडे प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे. ही खोली अत्यंत आकर्षकपणे सजवली पाहिजे. तेथे मंद सुगंध आणि मंद संगीत असल्यास येणारा ग्राहक अर्थातच खुश होतो. अधिकाधिक ग्राहकही यामुळे आकर्षित होतात.
शिवाय या खोलीत भरपूर प्रकाश असू द्या. अनावश्यक फर्निचर तेथे ठेवू नका. फर्निचरची गर्दी डोळ्यांना त्रास देते. शिवाय वावरण्यासही अडचण निर्माण होते. पुरेसा प्रकाश नसल्यास ग्राहकाच्या आणि मालकाच्या मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव पडतो. त्यामुळे होणारा व्यवसायही होत नाही. फर्निचरने भरलेल्या कोंदट खोलीमुळेही असाच अनुभव येतो.