घर खरेदी करण्यापूर्वी किंवा बांधण्यायपूर्वी वास्तुशास्त्राचे काही नियम लक्षात घेणे आवश्यक आहे. वास्तुत काही दोष राहिल्यास आपल्यामागे आयुष्यभरासाठी संकटाची मालिका लागू शकते. जीवनात वारंवार येणार्या अडचणी प्रगतीला बाधक ठरतात. घरातील सुख-शांती हिरावून घेतात. म्हणूनच घर, दुकान किंवा कार्यालय बांधण्यापूर्वी काही बाबी लक्षात घेणे महत्त्वाचे आहेत.
* घराच्या बैठक खोलीत खरकटी भांडी ठेवल्याने घरातील प्रमुख महिलेच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असतो. कुटूंबातील सदस्यांचे आपसात जमत नाही.
* बैठकीच्या खोलीत पाण्याने भरलेली वस्तू ठेवू नये.
* बैठकीच्या खोलीत वैयक्तिक किंवा मित्रांसोबत व्यसन करणे प्रगतीला बाधा उत्पन्न करू शकते.
* घरातील जिन्याखाली बसून कोणतेच चांगले काम करू नका.
* घराच्या प्रवेशद्वारसमोर कोणत्याच प्रकारचा अडथळा ठेवू नका.
* प्रवेशद्वाराच्या दिशेने पाय करून रात्री झोपू नका. तसे केल्याने लक्ष्मीचा अपमान होत असतो.
* न्यायालयाची फाईल देवघरात ठेवल्याने दावा आपल्या बाजूने लागण्यास मदत होते.
* स्वर्गवासी स्वजनांचे फोटो नेहमी दक्षिण दिशेला लावले पाहिजे. घरातील घड्याळे कधी बंद पडणार नाहीत, याची काळजी घ्यावी. कारण घरात बंद पडलेली घड्याळी घराची घडी विस्कळीत करतात.
* घरातील पलंग कधीच भिंतीला खेटून ठेवू नका. तसे केल्यास पत्नी-पतीमध्ये दरी निर्माण होते.
* तीन रस्त्यांवर घर असणे अशुभ असते. अशा घरातील दोष दूर करण्या-साठी घराच्या चारही भिंतीला आरसा लावावा.
* घरात एखादा सदस्य नेहमी आजारी पडत असेल तर त्याला घराच्या नैऋत्य कोपर्यायत झोपवले पाहिजे. ईशान्य कोपर्यार पाणी ठेवल्याने अधिक लाभ होतो.
* घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर काळ्या घोड्याच्या पायाची नाल, दुर्गा यंत्र, त्रिशक्ति, आत बाहेर श्री गणपतीची प्रतिमा तसेच दक्षिणमुखी द्वार असेल तर हनुमानाची प्रतिमा किंवा भैरव यंत्र लावल्याने घरातील दोष दूर होतात.
* औषधे नेहमी ईशान्य कोपर्या्त ठेवली पाहिजे. औषधे घेतानाही तोंड ईशान्य दिशेनेच पाहिजे. असे केल्याने औषधांचा प्रभाव तत्काळ जाणवतो.