Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घर असावे वास्तुशास्त्राप्रमाणो!

घर असावे वास्तुशास्त्राप्रमाणो!
आपण घर घेताना सगळ्यात जास्त काळजी घेत असतो. कारण घर एक अशी वास्तू आहे की, ते मांगल्याचं प्रतीक मानले जाते. माणसांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठे ध्येय असते की, आपलं एक सुंदर घर असायला हवं; पण घर घेताना आपण घर हे खूप पॉश ठिकाणी बघत असतो. बर्‍याच वेळेला वास्तुशास्त्रानुसार ते घर योग्य आहे का? हेच आपण बघत नाही, त्यामुळे आपल्या घरात काही विचित्र गोष्टी घडत असतात; परंतु आपल्याला ते लक्षात येत नाही की, असं का होतंय. वास्तुशास्त्राची रचना करताना अनेक प्राचीन ऋषींनी खूप खोलवर विचार केलेले ग्रंथ लिहिलेले आहेत.
 
या वास्तुशास्त्रानुसार घर असले, तर घरही सुंदर होते व घरात शांतताही प्रस्थापित होते. बेडरूम, किचन, हॉल, देवघर हे सगळे वास्तुशास्त्रानुसार हवे. गृहिणी स्वयंपाक करताना पूर्व, उत्तर दिशेला हवे. देवघर हे ईशान्येच्या कोपर्‍यात असायला हवे. किंवा पूर्व-पश्‍चिमेला असायला हवे. बेडरूम ही नैर्ऋत्यास असायला हवी. प्रवेशद्वार हे उत्तर, पूर्व दिशेला असणे अत्यंत शुभ मानले जाते. घरात तुटलेली भांडी ठेवू नये. काचेच्या तुटलेल्या वस्तू ठेवू नयेत, त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो.
 
घरामध्ये खालील सहा फोटो नकोतच
 
महाभारताच्या युद्धाचे चित्र, ताजमहल, नटराजाची मूर्ती, बुडणारे जहाज, फवारा, जंगलातील जनावरांचे फोटो आदी चित्र घरात ठेवू नयेत. असे मानले जाते की, जशी घरात चित्र असतात तसेच वातावरण घरात तयार होत असते; पण आपल्याला कधी कळून येत नाही. वास्तुशास्त्रानुसार १00 टक्के घर असणे, ही एक कल्पना आहे. हे आपल्याकडून कधीच शक्य होत नाही. वास्तूमध्ये काही ना काही दोष तर हे राहणारच.. ते दोष कमीत कमी राहतील म्हणून वास्तुशास्त्रानुसार रचना करावी, त्यामुळे आपल्या घरात सुख-शांती येते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शनीला प्रसन्न करण्यासाठी काही सोपे उपाय!