Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देवघर : मनःशांती देणारे ठिकाण

देवघर : मनःशांती देणारे ठिकाण
आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात आल्यानंतर होणारा आनंद अवर्णनीय असतो. घर तेथे देवघर आलेच. पूजा, आरती, आराधना, परमेश्वराविषयी मनात असणारी भक्ती, श्रध्दा व्यक्त करण्याचे माध्यम आहे. जगाचा निर्माता, पालनकर्त्या परमेश्वराची आठवण संकटाच्यावेळी झाल्याशिवाय राहत नाही. परमेश्वरास संकटमोचन, विघ्नहर्ता उगाचच म्हटले जात नाही.

घरातील विशेषत मोठ्या मंडळींच्या र्‍हदयात देवघरास विशेष स्थान असते. घरात छोट्या जागेत अगदी सुंदर, सुबक देवघर बनविण्याकडे गृहिणींचा कल असतो. देवघर म्हणजे घरात शांती, समृद्धीचे प्रतीक मानले जाते. वास्तूशास्त्राचा आधार घेऊन देवघराची योजना केल्यास त्यास शास्त्रीय अधिष्ठानही लाभते. सर्वप्रथम दिशा निश्चिती करावी. देवघर किवा पूजागृह घराच्या ईशान्येस ठेवणे शुभ मानले जाते.

देवघरातील परमेश्वराच्या मूर्ती, पूर्व किवा पश्चिम दिशेकडे असतील याकडे लक्ष द्यावे. देवघरात गणपती, श्री लक्ष्मी व सरस्वती यांच्या उभ्या अविर्भावातील मूर्ती ठेवणे टाळावे. भैरव़ नरसिंह व दुर्गा या देवतांची स्थापना दक्षिणायनाच्या काळात करावी. देवघरात देवतांना कधीही कोपर्‍यात ठेवणे टाळावे. यासोबतच भंगलेली मूर्ती ठेवू नये. देवघराचे दार सहसा उत्तर किवा पूर्व दिशने ठेवावे.

घराची इमारत एकापेक्षा जास्त माळ्यांची असल्यास देवघर तळमजल्यावर असलेले अधिक चांगले. देवघरास रंग देतांना अधिक काळजी घ्यावी. देवघर घडविण्यासाठी मौल्यवान दगड वापरला जातो. देवघरासाठी पांढरा किवा पिवळा रंग शुभ समजला जातो. देवघराजवळ चपला किवा वहाणा ठेवू नये. यामुळे कुटूंबात वाद, कलह वाढण्याची शक्यता असते. देवघर किवा पूजाघरात कसल्याही प्रकारची टाकाऊ सामग्री ठेवू नये. देवघराच्या नजीक़, वर किंवा खाली स्वच्छतागृह नसेल याची दक्षता घ्यावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आज तुमचा वाढदिवस आहे (02.05.2016)