देऊळ हा शब्द `देव उळ' या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ `देवाने जवळ येणे.' निर्गुणातील देव देवळातील मूर्तीच्या माध्यमातून आपल्या जवळ आलेला असतो.
महत्त्व हिंदूंची मंदिरे म्हणजे ईश्वराने मानवाला दिलेली अभूतपूर्व भेटच आहे. कलियुगातही मंदिरांमुळे भूतलावरील सात्त्विकता टिकून आहे.
मंदिरांचे कार्य वातावरणातील सात्त्विकता व विशिष्ट देवतेचे तत्त्व वाढवणे मंदिरांमुळे आजूबाजूच्या वातावरणातील सात्त्विकता वाढते. त्याचबरोबर ज्या देवतेचे मंदिर असते, त्या देवतेचे तत्त्व त्या परिसरात जास्त प्रमाणात कार्यरत असते. या व्यतिरिक्त मंदिरांच्या माध्यमांतून जे सूक्ष्म-कार्य होते, त्याची कल्पनाही आपल्याला नसते.