मुलांना चांगल्या शाळेत दाखल करून व चांगली ट्यूशन दिल्यानंतरही परीक्षेच्या निकालात मात्र त्याचा सकारात्मक परिणाम दिसत नाही. याची अनेक कारणे आहेत. मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही. अभ्यास म्हटला की दूर पळतात. मुलांची एकाग्रता वस्तूशी निगडित असते. तुम्ही विपरीत दिशेने काम केले तर कितीही सकारात्मक प्रवृत्तीचे असलात तरी त्याचे परिणाम विपरीतच होतात.
म्हणूनच वास्तूशी संबंधित काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचा परिणाम नक्कीच तुमच्या मुलाच्या शालेय प्रगतीवर होईल.
वास्तुशास्त्रानुसार मुलांची अभ्यासाची खोली वायव्य, नैऋत्य कोपरा किंवा पश्चिम दिशेत असायला पाहिजे.
घराच्या ईशान्य कोपर्यात पूर्वेकडे जिथे देवघर असेल त्याच्या जवळच मुलांच्या अभ्यासाची जागा ठेवली तर फारच उत्तम. याचा निश्चितच फायदा होईल.
हा उपाय केल्याने मुलांच्या बुद्धीत वाढ होते व कुठलीही गोष्ट त्याच्या मेंदूत लवकर 'फिट' होऊन मेंदूला जास्त ताण देण्याची गरज पडत नाही.