शिक्षण पूर्ण झाल्यावर नेहमी तरुणांच्या मनात ही द्विधा मनस्थिती निर्माण होते की नोकरी किंवा व्यवसाय यापैकी त्यांच्यासाठी काय योग्य आहे.या संबंधी जन्मपत्रिकेचा योग्य अभ्यास करून योग्य दिशा ठरवण्यास मदत होऊ शकते.
* नोकरी किंवा व्यवसाय ठरवण्यासाठी प्रथम पत्रिकेच्या 9 व्या, 7 व्या स्थानी व लग्नी असणार्या राशीस्वामी तसेच त्या भावात असणार्या ग्रहांना अभ्यासले जाते.
* लग्नी किंवा सातवे स्थान बलवान असेल तर स्वतंत्र व्यवसायात सफलतेचे योग आहेत.
* विशेषत: लग्नराशी, चंद्र राशी आणि दशम भावाच्या ठिकाणी असणार्या ग्रहबलाच्या तुलनात्मक अभ्यासाने व्यवसाय निवडणे योग्य ठरते विशेषत: अग्नी तत्वाच्या राशी (मेष, सिंह, धनु)च्या व्यक्ती बुद्धी व मानसिक (शैक्षणिक) व्यवसायात सफल होतात. उदा. कोचिंग क्लास, कंसलटन्सी, लेखन, ज्योतीष इत्यादी.
* पृथ्वी तत्वाच्या राशींना (वृषभ, कन्या, मकर) शारीरिक क्षमतेचा व्यवसायात उदा. कृषी, घरबांधणी, राजकारण इत्यादी व्यवसायात यश मिळेल.
* जलतत्वाच्या राशींच्या (कर्क, वृश्चिक, मीन) व्यक्ती व्यवसाय बदलत राहतात त्यांना तरल पदार्थ, स्पिरीट, तेल, जहाजावरील सफर, दुध व्यवसायात वगैरे व्यवसायात यश मिळते.
* वायु तत्व (मिथुन, तुळ, कुंभ) प्रधान व्यकती साहित्य, डॉक्टर, कलाकार, प्रकाशक, लेखक, रिपोर्टर, मार्केटिंग या सारख्या कामात आपले कौशल्य दाखवू शकतात.
* यासंबंधी विचार करताना दहाव्या स्थानी असणार्या ग्रहांचा विचार केला जातो.
* दहाव्या स्थानी सूर्य असेल तर :- वडीलार्जित व्यवसायात (औषधे, ठेकेदारी, सोन्याच्या व्यवसाय, कापडाची खरेदी विक्री) प्रगती होते. तसेच सरकारी नोकरीतही चांगल्या पदाची प्राप्ती होते.
* चंद्र असल्यास व्यक्ती आईच्या घरचा व्यवसाय किंवा मातृधनाच्या सहाय्याने व्यवसाय करतो. (उदा. अलंकार, मोती, शेती, कपडा इत्यादी)
* मंगळ 9 व्या स्थानी असल्यास :- भावाशी पार्टनरशीपमध्ये (इलेक्ट्रीक उपकरणे, शास्त्रास्त्रे, फटाके, वकीली) व्यवसायात लाभ तसेच या व्यक्ती पोलीसात किंवा लष्करातही यशस्वी होऊ शकतात.
* बुध :- मित्रांबरोबर व्यवसाय लाभदायक, लेखक, कवी, ज्योतीष, पुरोहीत, चित्रकला, वक्तृत्व यासंबंधी कार्य
* गुरु :- भावा-बहीणीशी व्यवसायात लाभ इतिहासकार, प्राध्यापक, धर्मोपदेशक, जज्ज, व्याख्याता इत्यादी कामात लाभ.
* शुक्र :- बायकोकडून धनलाभ, व्यवसायात मदत, सोनाराचे काम, हॉटेल व्यवसाय, अलंकार, पुष्पविक्रय इत्यादी कार्यात लाभ.