घरात देवघराला अनन्य साधारण महत्त्व आहे. देवघर असे असतेकी परमेश्वारासोबत सरळ आपण संवाद साधत असतो. देवघरातच आपल्याला परम शांती मिळत असते. पूर्वी देवघर घराच्या चौकटीत केले जात नव्हते तर ते घराच्या बाहेर एका बाजूला केले जात होते त्याला सर्वजण मंदिर म्हणून संबोधत होते.
मात्र, लोकसंख्या लक्षात घेता आता जागा अपूर्ण पडू लागली असल्याने घराबाहेर असलेले मंदिर घराच्या आत आले आहे. परंतु वास्तुशास्त्रानुसार देवघर बांधताना त्याची दिशा व सजावट यांची आधी विचार केला पाहिजे, त्याचे तसं नियोजन केले पाहिजे त्यामुळे त्यापासून सकारात्मक लाभ होतात.
स्थळ : देवघर घरातील उत्तर-पूर्व दिशेच्या कोपऱ्यात असल्याने सुख, शांती, धन, संपत्ती व प्रसन्नता प्राप्त होते. देवघराच्या वरच्या मजल्यावर किंवा खालच्या मजल्यावर शौचालय अथवा स्वयंपाक घर नसावे. तसेच घरातील शिडीच्या खाली देखील देवघर बांधू नये. देवघर हे तळमजल्यावरच खुले व मोठे असायला पाहिजे.
देवाघरातील मूर्ती : देवघरात कमी वजनाच्या मूर्ती ठेवल्या पाहिजे. त्यांची दिशा ही पूर्व, पश्चिम, उत्तरमुखी असू शकते मात्र दक्षिणमुखी मुळीच नको. परमेश्वराचा चेहरा कुठल्याही वस्तूने अथवा फूल-माळाने झाकला जाता कामा नये. तसेच परमेश्वराच्या मुर्त्या भिंतीपासून साधारण एक इंचापर्यंत दूर ठेवल्या पाहिजे. त्यांच्यासोबत आपल्या माता-पितांच्या प्रतिमा देखील ठेवता कामा नये. भंगलेल्या मुर्त्या देवघरातून काढून त्यांना नदीत विसर्जित करून दिल्या पाहिजे.
दिवा : देवघरात दिवा हा पूजेच्या थाळीत देवाच्या समोर ठेवला पाहिजे. दिव्यात दोन जळत्या वाती पूर्व व पश्चिम दिशेने ठेवाव्यात.
देवघराचा दरवाजा : देवघराचा दरवाजा व खिडकी उत्तर किंवा पूर्व दिशेनेच पाहिजे. दरवाजा हा धातूला अथवा पोलादाचा असून भिंतीमध्ये घट्ट केलेला असावा. तसेच देवघराचे छत हे उंच असावे.
इतर : धूप, अगरबत्ती व यज्ञकुंड देवघरात दक्षिण-पूर्व दिशेच्या कोपऱ्यात ठेवावे. घरातील इतर वस्तू अथवा सौंदर्य प्रसाधने देवघरात ठेवायच्या नाहीत. पूर्व दिशाकडे तोंड करून पुजा केली पाहिजे. तसेच दागिने अथवा किंमती वस्तू देवघरात न ठेवाव्यात.