Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वास्तुशास्त्राला आधार पंचागांचा

वास्तुशास्त्राला आधार पंचागांचा
वास्तुशास्त्रात ज्योतिषाचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यासाठी पंचागाचाही अभ्यास हवा. त्याचबरोबर पंचागातील संज्ञांचा अर्थही माहिती पाहिजे. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्रात किंवा ज्या नक्षत्राच्या जवळ आहे त्याच्या आधारे भारतीय मराठी महिन्यांची नावे दिली आहेत ती खालील प्रमाणे आहेत.
भारतीय मराठी महिने   
क्रमांक
महीना
नक्षत्र
01
चैत्र
चित्रा
02
वैशाख
विशाखा
03
ज्येष्ठ
ज्येष्ठा
04
आषाढ
उत्तराषाढा
05
श्रावण
श्रवण
06
भाद्रपद
पूर्व भाद्रपद
07
अश्विन
अश्विनी
08
कार्तिक
कृतिका
09
मार्गशिर्ष
मृग
10
पौष
पुष्य
11
माघ
मघा
12
फाल्गुन
पूर्वाफाल्गुन



 













 

 
वार :- एका दिवस़, रात्रीत चोवीस तास असतात प्रत्येक होरा एका तासाच्या बरोबर असतो. तासाचाच दुसरा भाग होरा आहे, असेबी म्हटले जाते. सात ग्रहांच्या पहिल्या होर्‍यावरून सात दिवसांची (वारांची) नावे ‍ठेवली आहे ती अनुक्रमे
1. रविवार
2. सोमवार
3. मंगळवार
4. बुधवार
5. गुरुवार
6. शुक्रवार
7. शनिवार

ज्योतिषशास्त्रानुसार अवकाशात शनी, गुरू, मंगळ, रवी, शुक्र, बुध तसेच चंद्र या सात ग्रहांची स्थिती एकाखाली एक आहे असे मानले आहे. अर्थात शनी सर्वांत वर व सगळ्यात खाली चंद्र.

गुरुवार, बुधवार, सोमवार व शुक्रवार हे चार वार 'सौम्य संज्ञक' तसेच मंगळवार, ‍रविवार व शनिवार हे तीन वार 'क्रूर संज्ञक' मानले जातात. कोणतेही कार्य करण्यासाठी 'सौम्य संज्ञक' वार चांगले मानले जातात प्रत्येक वाराचा स्वामी हा त्या वाराचा अधिपती ग्रह असतो.

करण :- तिथीच्या अर्ध्या भागला करण म्हणतात. अर्थात एका तिथीत दोन करण असतात. करणांची नावे पुढील प्रमाणे :- 1. बव 2. बालव 3. कौलव 4. तैतिल 5. गर 6. वणिज 7. विष्टी 8. शकुनी 9. चतुष्पाद 10. नाग 11. किंस्तुघ्न या करणांपैकी पहिले 7 करण चर संज्ञक व शेवटचे 4 करण स्थिर संज्ञक आहेत.

योग : - सूर्य व चंद्राची स्थाने व कला यांना मिळवून 800 ने भागल्यावर योगांची संख्या मिळते बाकी वरून हे ओळखले जाते. चालू योगाची किती कला येऊन गेलेल्या आहेत, बाकी 800 ने कमी केल्यावर चालू योग बाकी कला समजतात या होऊन गेलेल्या कलांना 30 ने गुणून सूर्य आणि चंद्राची स्पष्ट दैनिक गतीच्या योगाने भागल्यावर चालू योगची घटिका येते. जेव्हा अश्विनी नक्षत्राच्या सुरवातीला सूर्य आणि चंद्र दोन्ही मिळून 800 कलांच्या पुढे गेल्यावर एक योग पूर्ण होते. जेव्हा 1600 कला पूर्ण होतात तेव्हा दोन अशा प्रकारे दोन्ही राशींच्या 21,600 कला अश्विनी नक्षत्राच्या पुढे पूर्ण होतात तेंव्हा 27 योग पूर्ण होतात. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दैनिक राशीफल 01-10-2016