Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सात सात सातः शुभकालाच्या आगमनाचा संकेत

पं. अशोक पंवार 'मयंक'

सात सात सातः शुभकालाच्या आगमनाचा संकेत
सात, सात, सात चा आज आलेला योग ७-०७-१०७ मध्ये त्यानंतर ७-०७-१००७ आणि आता ७-७-२००७ मध्ये आला आहे. म्हणजे एक हजार वर्षानंतर हा योग आला आहे. आणि यापुढेही याच क्रमाने तो येत राहील. म्हणजे पुढच्या हजार वर्षांनी. तीन सातांची बेरीज केल्यासही शुभांक तीन येतोय. त्याला गुरुचा अंक मानले जाते. त्यात पूर्ण २००७ यांचा समावेश केला जात नाही. केवळ वर्ष तेवढे घेतले जाते. त्यामुळे या दिवशी जन्माला येणारे बालक विलक्षण बुद्धिमान असेल. त्याचे कर्तृत्वही असीम असेल.

अंकशास्त्रानुसार सात हा अंक नेप्च्यूनचा मानला गेला आहे. हा अंक ज्यांचा आहे, ती मंडळी संशोधक प्रवृत्तीची, शरीरप्रकृती ठाकठीक असलेली, पर्यटनाची आवड असणारी, कवी हृदयाची असतात. सन आणि महिना याच्यात गृहीत धरले तर बेरीज १४ होते. हा बुधाचा अंक आहे. त्यामुळे या दिवशी जन्मणारे बालक नेप्च्यून, बुध व गुरू यांच्या प्रभावाखाली राहील. थोडक्यात बुद्धीच्या प्रांतात हे बालक इतरांपेक्षा नक्की वेगळे असेल. जे कार्य करायचे आहे, ते यशस्वी करण्यासाठीची क्षमता त्याच्यात पुरेपूर असेल. त्याचे वैवाहिक जीवनही संमिश्र असेल.

हे बालक मानसोपचारतज्ज्ञ किंवा बालरोग तज्ज्ञसुद्धा बनू शकतो. तसेच शास्त्रज्ञ किंवा गुप्तचर हाही त्याचा पेशा असू शकतो. या क्षेत्रात तो गेल्यास त्याला यश मिळण्याची शक्यता सर्वांत जास्त आहे. वैवाहिक संबंधाचा विचार केल्यास, या दिवशी लग्न करणे शुभ ठरणार नाही. कारण या दिवशी शनिवार असून मालाष्टमी आहे. आज मीन राशी असून शनी व मंगळाचा एकमेकांवर रुष्ट असल्याचे दिसत आहे. शिवाय पंचकही आहे. अशा परिस्थितीत लग्न न करणे उत्तम. अन्यथा वैवाहिक जीवनात अडचणी संभवतात.

या दिवसांनंतरचा आगामी काळात धर्म, कर्म याकडे लोकांचा कल वाढेल. न्यायदानाची प्रक्रिया गती पकडेल. प्रशासनात सुधारणा अपेक्षित आहे. अन्नसाठा वाढेल. सोने आणि पिवळ्या रंगांच्या वस्तूंमध्ये तेजीची शक्यता आहे. ज्यांचा गुरू प्रबळ असेल त्यांना यश हमखास मिळेल. सध्या मंगळाची राशी वृश्चिकाशी गुरुचे दृष्टिभ्रमण सुरू आहे. २००७ मध्ये धनूबरोबर भ्रमण होईल. त्यामुळे येणारे वर्ष शुभ असेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi