घर ही अशी जागा आहे जेथे प्रत्येक व्यक्तीला सुख आणि आराम मिळत. मग ते आपले स्वत:चे घर असो किंवा भाड्याचे. ज्या घरात, मकान, फ्लॅट किंवा भवनात तुम्ही राहता आणि जेथे काम करता, त्याच्या वास्तूचा प्रभाव त्या घरात राहणार्या सर्व व्यक्तींवर पडतो.
वास्तूच्या शुभ प्रभावात सुख, समृद्धी आणि आनंदाची प्राप्ती होते आणि वास्तूच्या अशुभ प्रभावामुळे दूख, दरिद्रता आणि क्लेशाचे वातावरण असत. आमच्या आरोग्यावर देखील याचा शुभ-अशुभ प्रभाव पडतो. कुठल्याही भवन निर्माणासाठी सर्वप्रथम भूमीबद्दल जाणून घेणे जरूरी आहे की जमिनीचा हा तुकडा, चोकोर किंवा आयताकार आहे की नाही. इतर आकाराचे भूखंडांच्या शुभाशुभाची परीक्षेसाठी भूमी परीक्षण केले जाते.
जमिनीच्या खुदाईच्या दरम्यान निघणार्या वस्तू जसे कोळसा, लोखंड, काळी धातू, सीसा, हड्डी इत्यादी निघणे शुभ नसते. भूमीच्या शुभाशुभ परीक्षणासाठी इतर परीक्षण केले जाते. एक मीटर चौरस व एक मीटर खोल गड्डा खोदून त्यातून निघणार्या मातीला परत गढ्यात भरा. जर गड्डा भरला नाही आणि माती कमी पडली तर ती जागा राहण्या योग्य नाही. जर खोदलेल्या मातीने गड्डा भरला तर जमीन मध्यम आणि जर गड्डा भरल्यानंतर माती उरली तर ती जमीन मकान बनवण्यासाठी उत्तम आहे.
भूमीच्या शुभाशुभ फल जाणून घेण्यासाठी या गोष्टींचे लक्ष ठेवणे जरूरी आहे. भवनासाठी प्रयुक्त भूमी स्मशान, कब्रिस्तान इत्यादी नको. या जमिनीवर साप, दीमक, विंचू, बंदर, मुंगळ्यांचा वास नसावा. जर गाढव, कुत्रे, सियार इत्यादी जनावर बसत असतील ती जागा ही घर बांधण्यासाठी योग्य नसते. ज्या भूमीवर गाय, घोडे इत्यादी बसतात आणि ज्या जमिनीवर मुंगुसाचा वास असतो किंवा त्या जागेवरच्या झाडांवर कावळ्यांचा वास असतो ती जागा भवन निर्माण करण्यासाठी फारच उत्तम असते.